02 March 2021

News Flash

‘वॉशिंग्टन पोस्ट’चा हिलरी क्लिंटनना पाठिंबा

‘दि वॉशिंग्टन पोस्ट’ या वृत्तपत्राने हिलरी क्लिंटन यांना अध्यक्षपदासाठी पाठिंबा दिला आहे.

‘दि वॉशिंग्टन पोस्ट’ या वृत्तपत्राने हिलरी क्लिंटन यांना अध्यक्षपदासाठी पाठिंबा दिला आहे. या पदासाठी डोनाल्ड ट्रंप यांच्या भयावह बेतालपणाच्या पाश्र्वभूमीवर क्लिंटन यांची सक्षमता प्रभावित करणारी असल्याचे या दैनिकाने म्हटले आहे.

हिलरी क्लिंटन यांच्यात अमेरिकेच्या एक उत्कृष्ट अध्यक्ष होण्याची क्षमता आहे आणि आम्ही कुठल्याही संकोचाशिवाय त्यांना पाठिंबा देत आहोत; केवळ त्यांचे प्रमुख प्रतिस्पर्धी भीतिदायक असल्यामुळे नव्हे, असे या प्रभावशाली वृत्तपत्राने म्हटले आहे.

क्लिंटन यांनी भूतकाळात राजकीय आणि वैयक्तिक आयुष्यात काही चुकीची पावले उचलली असली, तरी त्यांच्या क्षमतांनी त्यावर मात केली असल्याचेही मत या दैनिकाने व्यक्त केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 14, 2016 2:16 am

Web Title: the washington post support hillary clinton
Next Stories
1 समान नागरी कायद्याला मुस्लिम संघटनांचा विरोध
2 चार राज्यांच्या भूसंपादन कायद्यांतील तरतुदी शिथिल
3 चंदू चव्हाण इस्लामाबादमध्ये असल्याची पाकिस्तानची कबुली
Just Now!
X