संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी दोन दिवसांपूर्वी अणवस्राचा प्रथम वापर न करण्याचे धोरण भारत कायम ठेवीलच असे नाही, असे म्हटल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी यावर रविवारी प्रतिक्रिया देताना सांगितले की, भारतातील फॅसिस्ट, वंशवादी तसेच हिंदू वर्चस्ववादी सरकारच्या काळात तेथील अणस्रांचा साठा सुरक्षित नाही. याची आंतरराष्ट्रीय समुदायाने नोंद घ्यावी.

भारताच्या अणवस्रसाठ्याचा सुक्षेचा मुद्दा गांभिर्याने विचारात घेण्याची गरच आहे. त्यामुळे प्रादेशिक शांतता धोक्यात येण्याची शक्यता असून त्याचबरोबर जागतिक शांततेसही धक्का बसू शकतो, असे त्यांनी ट्विद्वारे म्हटले आहे.

काश्मीर प्रश्नावरून जगाचे लक्ष हटवण्यासाठी भारत हल्ला करू शकतो असे वक्तव्य पाकिस्तानी लश्कराने केल्यानंतर, पंतप्रधान इम्रान खान यांनी वरील ट्विट केले आहे. मागील काही दिवसात भारताने काश्मीरचा विशेष दर्जा काढून घेतल्यामुळे तो अलिकडच्या काळातील संघर्षाचा केंद्र बिंदू ठरला आहे.