27 November 2020

News Flash

….तर तेजस्वी यादव यांनी देखील राजीनामा द्यावा; जदयूचा पलटवार

शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा दिल्यानंतर तेजस्वी यादव यांनी मुख्यमंत्री नितीश कुमारांवर साधला होता निशाणा

संग्रहीत

बिहारच्या शिक्षणमंत्री पदाचा मेवालाल चौधरी यांनी राजीनामा दिल्यानंतर, राज्यातील राजकीय वातवरण अधिक गरम झाले आहे. या मुद्यावरून आतापर्यंत सरकारवर निशाणा साधाणारे राजद नेते तेजस्वी यादव यांच्यावर आता जदयूने हल्ला चढवला आहे.

जदयूचे मुख्य प्रवक्ते संजय सिंह यांनी म्हटले की, जर त्यांची(तेजस्वी यादव) नैतिकता एवढीच त्यांना हादरवून सोडत असेल, तर त्यांनी देखील राजीनामा द्यावा. त्यांच्यावर तर आर्थिक गैरव्हवहार ते जमिनींवर कब्जा करण्यापर्यंतचे खटले दाखल आहेत.

आणखी वाचा- “मी म्हटलं होतं ना तुम्ही थकला आहात त्यामुळे तुमची विचारशक्ती क्षीण झाली आहे”

”मुख्यमंत्री नितीश कुमार भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचाराच्या आरोपींना सहन करत नाहीत. याचाच परिणाम आहे की मेवालाल चौधरी यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला. तेजस्वी यादव यांची नैतिकता एवढीच त्यांना हादरवून सोडत असेल, तर त्यांनी देखील राजीनामा देऊन उदहारण निर्माण करावं” असं जदयूच्या प्रवक्त्यांनी म्हटलं आहे.

आणखी वाचा- सरकार स्थापन झाल्याच्या तिसऱ्याच दिवशी बिहारच्या शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा

दरम्यान, शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा दिल्यानंतर तेजस्वी यादव यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर निशाणा साधला होता. ”मी म्हटलं होतं ना तुम्ही थकला आहात, त्यामुळे तुमची विचार करण्याची समजण्याची शक्ती क्षीण झाली आहे. मुद्दाम भ्रष्टाचाऱ्यास मंत्री बनवले. टीका होत असतानाही पदभार दिला व तासाभरातच राजीनाम्याचं नाटक रचलं. खरे गुन्हेगार तुम्ही आहात, तुम्ही मंत्री का बनवलं? तुमचा दुटप्पीपणा व नाटक आता चालू दिलं जाणार नाही?” असा तेजस्वी यादव म्हणले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 20, 2020 4:25 pm

Web Title: then tejaswi yadav should also resign jdu msr 87
Next Stories
1 करोनाचा कहर… ज्वेलरी शॉपमधील ३१ कर्मचारी करोना पॉझिटिव्ह; खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांचा शोध सुरू
2 वाढत्या प्रदूषणामुळे सोनिया गांधींनी सोडलं दिल्ली शहर, काही दिवस मुक्काम गोव्यात
3 धक्कादायक! संपूर्ण गावच निघालं ‘करोना पॉझिटीव्ह’
Just Now!
X