महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर यावर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाष्य केलं आहे. संविधानिक पदावरील काही लोक भाजपाच्या मुखपत्राप्रमाणे काम करीत आहेत, अशा शब्दांत त्यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर टीका केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बॅनर्जी म्हणाल्या, “अशा लोकांचा काही राज्यांमध्ये समांतर सरकार चालवण्याचा प्रयत्न सुरु आहे. आमच्या राज्यातही हेच घडत आहे. काही नामनिर्देशित व्यक्ती आपल्या मर्यादित अधिकारांबाहेर जाऊन काम करीत आहेत. त्यांनी राज्यांवर अधिराज्य गाजवू नये, याची केंद्राने काळजी घ्यावी.”

राज्यापालांवर टीका करताना बॅनर्जी म्हणाल्या, “मी संविधानिक पदांबाबत कधीही भाष्य करीत नाही मात्र, काही लोक स्वतः भाजपाच्या मुखपत्राप्रमाणे काम करीत आहेत. माझ्या राज्यात देखील सध्या काय सुरु आहे हे तुम्ही पाहत आहात. त्यांना राज्यांमध्ये समांतर सरकार चालवायचे आहे. केंद्र आणि राज्य सरकारे ही जनतेने निवडून दिलेली असतात. ही संसदीय पद्धत घटनेनुसार काम करते. राज्यातील सरकारांना त्यांची काम करु द्यायला हवीत.”

महाराष्ट्रात कोणताही पक्ष राज्यपालांकडे सरकार स्थापनेसाठी बहुमताचा आकडा देऊ न शकल्याने सरकार स्थापन होऊ शकले नाही आणि राष्ट्रपती राजवट लागू झाली. दरम्यान, जुलै महिन्याच्या शेवटी पश्चिम बंगालमध्ये सत्ताधारी पक्ष तृणमुल काँग्रेसशी विविध विषयांवरुन राज्यपाल जयदीप धनखर यांचे वाद झाले होते.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: There are some people who are working like a bjp mouthpiece says mamata banerjee aau
First published on: 14-11-2019 at 17:35 IST