25 November 2020

News Flash

पाकव्याप्त काश्मीरमध्ये एअरस्ट्राइकचं वृत्त खोटं, लष्कराचं स्पष्टीकरण

भारतीय लष्कराने दिलं स्पष्टीकरण

संग्रहीत छायाचित्र

भारतीय सीमारेषेजवळ कोणताही गोळीबार झाला नाही असं स्पष्टीकरण भारतीय लष्कराने दिलं आहे. एवढंच नाही तर पाकव्याप्त काश्मीरमध्ये एअर स्ट्राइक झाल्याचं वृत्तही खोटं असल्याचं भारतीय लष्कराचे डायरेक्टर जनरल (ऑपरेशन्स) लेफ्टनंट जनरल परमजीत सिंग यांनी सांगितलं आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये एअर स्ट्राइक झाल्याचं वृत्त काही प्रसारमाध्यमांनी दिलं होतं. या वृत्ताला काहीही अर्थ नाही हे वृत्त खोटं आहे असं परमजित सिंग यांनी म्हटलं आहे.

 

काही प्रसारमाध्यमांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये एअर स्ट्राइक झाल्याचं आणि पिन पॉइंट स्ट्राइक केल्याचं वृत्त दिलं होतं. मात्र असं काहीही घडलं नसल्याचं आता भारतीय लष्कराने स्पष्ट केलं आहे. पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर पिनपॉइंट स्ट्राइक करण्यात येतो आहे. पाकिस्तानी सैन्याकडून जम्मू काश्मीरमध्ये अशांतता पसरवण्यासाठी कट रचला जातो आहे त्यामुळे ही कारवाई केल्याचं म्हणण्यात आलं होतं मात्र असं काहीही घडलं नसल्याचं भारतीय लष्कराने म्हटलं आहे.

अनेक प्रसारमाध्यमांनी आणि वृत्त संकेतस्थळांनी भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमध्ये एअर स्ट्राइक केल्याचं आणि पिनपॉइंट स्ट्राइक करुन दहशतवादी तळ उद्ध्वस्त केल्याचं वृत्त दिलं. यासाठी पीटीआय या वृत्तसंस्थेचाही हवाला देण्यात आला. मात्र प्रत्यक्षात असा कोणताही एअरस्ट्राइक किंवा कोणताही गोळीबार झाला नसल्याचं भारतीय लष्कराने स्पष्ट केलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 19, 2020 7:52 pm

Web Title: there has been no firing at loc today says indian army scj 81
Next Stories
1 फटाके फोडणं हिंदू परंपरा नाही म्हणणाऱ्या महिला IPS अधिकाऱ्याला नेटिझन्सनी केलं ट्रोल
2 “मी म्हटलं होतं ना तुम्ही थकला आहात त्यामुळे तुमची विचारशक्ती क्षीण झाली आहे”
3 सरकार स्थापन झाल्याच्या तिसऱ्याच दिवशी बिहारच्या शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा
Just Now!
X