केंद्रामध्ये आई आणि मुलाचे तर उत्तर प्रदेशात वडील आणि मुलाचे सरकार सत्तेवर असल्याची टीका भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी सोमवारी एका जाहीर सभेत केली. आंबेडकर नगरमधील जाहीर सभेमध्ये मोदी यांनी नेहमीप्रमाणे कॉंग्रेस आणि समाजवादी पक्षावर हल्लाबोल केला.
ते म्हणाले, सरदार वल्लभभाई पटेल देशाचे पंतप्रधान झाले असते, तर आजचे चित्र निश्चितच वेगळे दिसले असते. देशातील शेतकऱयांची अवस्थाही आजच्यासारखी असली नसती. त्याचबरोबर काश्मीरमध्येही वाईटपर्व असले नसते. मात्र, एकाच कुटुंबाने सातत्याने त्यांना विरोध केला. सरदार पटेलांसारख्य नेत्यावर देशात कसा काय अन्याय झाला, याचे आपल्याला आश्चर्य वाटते.
लाल बहादूर शास्त्री यांनी ‘जय जवान, जय किसान’चा नारा दिला होता. मात्र, केंद्रातील यूपीए सरकारचा ‘मर जवान, मर किसान’ हाच आता नारा बनल्याचा आरोपही मोदी यांनी केला.