25 March 2019

News Flash

आरबीआयकडून ३.६ लाख कोटींची मागणी केलेली नाही; सरकारने दिले स्पष्टीकरण

गर्ग म्हणतात, आरबीआय आणि केंद्र सरकार यांच्यातील संबंधांबाबत माध्यमांमध्ये सध्या चुकीची माहिती आणि अफवा पसरल्या आहेत. सरकारचे राजकोषीय व्यवहार एकदम व्यवस्थित सुरु आहेत.

एस. सी. गर्ग

भारतीय रिझर्व्ह बँकेकडून (आरबीआय) ३.६ लाख कोटी रुपयांची मागणी करण्यात आलेली नाही, असे स्पष्टीकरण केंद्र सरकारडून देण्यात आले आहे. उलट शिखर बँकेची आर्थिक व्यवस्था निश्चित करण्यासंबंधी सध्या चर्चा सुरु आहे. अर्थ मंत्रालयातील आर्थिक विभागाचे सचिव सुभाष गर्ग यांनी ट्विटद्वारे याबाबत शुक्रवारी स्पष्टीकरण दिले आहे.

गर्ग म्हणतात, आरबीआय आणि केंद्र सरकार यांच्यातील संबंधांबाबत माध्यमांमध्ये सध्या चुकीची माहिती आणि अफवा पसरल्या आहेत. सरकारचे राजकोषीय व्यवहार एकदम व्यवस्थित सुरु आहेत. आरबीआयसमोर सरकारने ३.६ लाख कोटींचा कोणताही प्रस्ताव ठेवलेला नाही, या केवळ अफवा आहेत.

केवळ एकाच प्रस्तावावर चर्चा सुरु असून ती शिखर बँकेच्या पैशाची व्यवस्था निश्चित करण्यासंबंधी आहे. दरम्यान, सरकार चालू वित्तीय वर्षात राजकोषीय तूटीला जीडीपीच्या ३.३ टक्क्यांपर्यंत राखण्याच्या बजेटमधील ध्येयाप्रती यशस्वी होईल, असा विश्वास यावेळी गर्ग यांनी व्यक्त केला. उलट सरकारचे राजकोषीय व्यवहार हे सुरळीत सुरु आहेत, असेही ते म्हणाले.

सन २०१३-१४ मध्ये सरकारची राजकोषीय तूट जीडीपीच्या ५.१ टक्क्यांबरोबर होती. त्यानंतर सरकार सातत्याने ही तूट कमी करीत आले आहे. आम्ही वित्तीय वर्ष २०१८-१९च्या शेवटी राजकोषीय तूटीला ३.३ टक्क्यांपर्यंत निश्चित करु, असे आश्वासनही यावेळी सरकारच्यावतीने त्यांनी दिले.

राजकोषीय ध्येयांबाबत उठलेल्या अफवांना नाकारताना गर्ग म्हणाले, सरकारने यावर्षी अर्थसंकल्पात अर्थ बाजारातून कर्ज घेण्याचा विचार केला होता. त्यात ७ हजार कोटी रुपयांची कपात सरकारने स्वतःच केली आहे.

First Published on November 9, 2018 4:03 pm

Web Title: there is no proposal to ask rbi to transfer 3 6 or 1 lakh crore as speculated says sc garg dea secretary