भारत – चीन सीमेवरील परिस्थितीबाबत बोलताना केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी बुधवारी लोकसभेत म्हटले की, भारत सरकार देशाच्या सुरक्षेच्यादृष्टीने पुर्णपणे जागरूक आहे. वेळोवेळी हे पडातळून पाहिल्या जात असून योग्य ते निर्णय घेतले जात आहे. त्यांनी सांगितले की, भारत – चीन सीमेवर कोणताही तणाव नाही, सध्या या ठिकाणी शांतात आणि स्थैर्य कायम राहावे यासाठी दोन्ही देशांकडून आंतरराष्ट्रीय सामंज्यस्य कराराचा मान ठेवून शांततेची भूमिका घेतली गेली आहे. या ठिकाणी रस्ते, टनल, रेल्वे मार्गासह हवाई क्षेत्राचा विकास केला जात आहे. ज्यामुळे देशाची अखंडता आणि सुरक्षितात अबाधित ठेवली जाईल.

भारत – चीन सीमेवरील डोकलाम येथे २०१७ मध्ये दोन्ही देशांचे सशस्त्र सैनिक अनेक दिवस आमनेसामने होते. या काळात दोन्ही देशांमध्ये तणावाचे वातावरण होते. संरक्षण मंत्र्यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्रपती शी जीनपींग यांनी वुहान येथे एक संयुक्त बैठक केली. ज्यात सीमेवर शांतता व स्थैर्य कायम राखण्याचा निर्णय घेण्यात आला. काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी सरकार चीनच्या घुसखोरीकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केला होता. यावर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी स्पष्टीकरण दिले.

यावेळी राजनात सिंह म्हणाले की, भारत आणि चीन सीमेवर बहुतांश प्रमाणात शांतताच आहे. मात्र लाइन ऑफ अॅक्चुअल कंट्रोल (एलएसी) वर आकलनातील फरकामुळे वेळोवेळी स्थानिक पातळीवर अप्रिय परिस्थिती निर्माण होत असते. ज्याचे मुळ कारण म्हणजे भारत आणि चीन दरम्यान सामायिक ‘एलएसी’चा नसणे हे आहे.