२०१५ मध्ये देशात साहित्यिक आणि कलाकारांनी पुरस्कार वापसीची मोहीम राबवली. देशात असहिष्णू वातावरण वाढीला लागले आहे हे कारण देत अनेक कलाकार, साहित्यिक या सगळ्यांनी आपल्याला मिळालेले पुरस्कार परत केले. मात्र ही मोहीम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात वातावरण निर्मिती करण्यासाठी होती. असा आरोप साहित्य अकादमीचे माजी अध्यक्ष विश्वनाथ प्रसाद तिवारी यांनी केला आहे. एएनआयने या संदर्भातले वृत्त दिले आहे. ही मोहीम राजकीय हेतूने प्रेरित होती असेही विश्वनाथ प्रसाद तिवारी यांनी स्पष्ट केले आहे.

पुरस्कार वापसीची मोहीम सुरू करण्यामागे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात वातावरणनिर्मिती करणे हाच एक उद्देश होता. साहित्य क्षेत्रातल्या लोकांना पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधी वातावरण तयार करून ते वाढीला लावायचे होते असेही विश्वनाथ प्रसाद तिवारी यांनी म्हटले आहे.

२०१५ मध्ये देशभरात पुरस्कार वापसीची मोहीम राबवण्यात आली होती. या मोहिमेत अनेक साहित्यिक आणि कलाकार सहभागी झाले होते. देशात असहिष्णू वातावरण आहे. ही असहिष्णुता सहन करण्यासारखी नाही असे सांगत अनेक साहित्यिकांनी आपल्याला मिळालेले पुरस्कार परत केले होते. देशाप्रमाणेच महाराष्ट्रातही अशीच मोहीम राबवण्यात आली होती. आता या मागे फक्त मोदी विरोधाचे राजकारण होते आहे असे समजते आहे. साहित्य अकादमीच्या माजी अध्यक्षांनीच तसे स्पष्ट केले आहे.