News Flash

यावर्षी पदवीधर प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा होणार नाही ; UGC चा निर्णय

विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) रविवारी केली घोषणा

UGC चा निर्णय (photo indian express)

देशात करोनाने हाहाकार केला आहे. देशातील शिक्षण व्यवस्थेवर देखील याचा मोठा परीणाम झाला आहे. दरम्यान, करोनाच्या पार्श्वभूमीवर शैक्षणिक सत्र २०२१-२२ पासून पदवीपूर्व प्रवेशासाठी केंद्रीय विद्यापीठातील सामान्य प्रवेश परीक्षा (CUCET) यावर्षी लागू केली जाणार नाही, अशी घोषणा विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) रविवारी केली.

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने राष्ट्रीय शिक्षण धोरण (NEP) २०२० अंतर्गत सूचित केलेल्या केंद्रीय विद्यापीठांमधील सर्व पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सीयूसीईटीच्या कार्यपद्धती तपासण्यासाठी एक समिती गठीत केली होती.

तसेच यूजीसीने शनिवारी सर्व विद्यापीठे आणि महाविद्यालयांना १ ऑक्टोबरपर्यंत नवीन पदवी आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी वर्ग सुरू करण्याचे निर्देश दिले. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळासह शालेय मंडळे ३१ जुलैपर्यंत निकाल जाहीर झाल्यानंतर उच्च शैक्षणिक संस्थांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू करतील.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 19, 2021 10:46 am

Web Title: there will be no entrance exam for graduate admission this year ugc decision srk 94
Next Stories
1 लस घेताच करोनाविरोधातील लढाईत आपण बाहुबली बनतो – नरेंद्र मोदी
2 बकरी ईदनिमित्त करोना नियमांमध्ये दिलेल्या सवलती मागे घ्या, अन्यथा सर्वोच्च न्यायालयात जाऊ; IMA चा इशारा
3 Coronavirus: देशात गेल्या २४ तासांत ३८ हजारांहून अधिक रुग्ण करोनामुक्त; ४९९ मृत्यूंची नोंद
Just Now!
X