19 March 2019

News Flash

स्टीफन हॉकिंग यांचे काही अविश्वसनीय सिद्धांत माहितीयेत का?

एका अद्वितीय व्यक्तीचा असामान्य प्रवास

स्टीफन हॉकिंग

जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांनी वयाच्या ७६ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच अनेकांनीच विज्ञान क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या या शास्त्रज्ञाला श्रद्धांजली वाहण्यास सुरुवात केली. कृष्णविवर आणि इतर बऱ्याच संशोधनांमध्ये हॉकिंग यांचे महत्त्वाचे योगदान होते.

भौतिकशास्त्रज्ञ आणि विश्वशास्त्रज्ञ म्हणूनही ते ओळखले जातात. बालपणापासूनच हॉकिंग यांची जिज्ञासू वृत्ती आणि गणित, भौतिकशास्त्र या विषयांची आवड यांमुळे हॉकिंग यांनी पुढे जाऊन याच क्षेत्रांमध्ये काही अविश्वसनीय संशोधन केल्याचे पाहायला मिळाले. त्यांनी मांडलेल्या काही सिद्धातांमुळे संशोधनाची परिभाषाच बदलली गेली होती असं म्हणायला हरकत नाही. चला तर मग नजर टाकूया भौतिकशास्त्र आणि कॉस्मोलॉजीच्या विश्वात हॉकिंग यांनी दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानावर…

पाहा : अद्वितीय हॉकिंग

*विश्वरचनेची मुळ उत्पत्ती कुठून झाली याचा शोध लावण्यासाठीच्या सिद्धांतांमध्ये त्यांनी बरीच शोधपत्रकं सादर केली.
*वेळ आणि त्यामागचे सिद्धांत त्यांनी मांडले.
*द बिग बॅंग थिअरी (विश्वोत्पत्तीचा सिद्धांत).
*विश्वाची सुरुवातच गुरुत्वाकर्षणातील विलक्षणतेमुळे झाली होती हा सिद्धांत त्यांनी मांडला.
*सिंग्युलारिटी ही विश्वातील एक सर्वसामान्य बाब आहे.
*कृष्णविवरे किरणोत्सर्ग करत असावीत हा सिद्धांत त्यांनी मांडला.
*विश्वाला वेळ आणि सीमेच्या मर्यादा नाही.
*देव अस्तित्वातच नाही, या मुद्द्यावरच ते ठाम होते.
*परग्रहवासीयांचे अस्तित्व नाकारता येणार नाही. ते कदाचित आपल्यापेक्षा जास्त प्रगत असतील या मतावर ते ठाम होते.

First Published on March 14, 2018 11:00 am

Web Title: these are the discoveries were made by professor stephen hawking