25 April 2019

News Flash

‘सकाळी म्हणतात अम्मा, रात्री करतात सेक्सची मागणी’

श्री रेड्डी या अभिनेत्रीने तेलगु सिनेसृष्टीतील कास्टिंग काऊचचे वास्तव समोर आणले, त्यानंतर आता आणखी एका महिला कलाकाराने या संदर्भात आरोप केला आहे.

सिनेसृष्टीत कास्टिंग काऊचचा प्रकार कशा प्रकारे रूळला आहे याचे काही प्रसंग समोर आले आहेतच. अशात टॉलिवूड म्हणजेच दाक्षिणात्य सिनेसृष्टीतही कास्टिंग काऊच मोठ्या प्रमाणावर होते आहे हे अभिनेत्री श्री रेड्डीने टॉपलेस आंदोलन करत समोर आणले. आता आणखी एका दाक्षिणात्य अभिनेत्रीने सकाळी आपल्याला अम्मा म्हणणारे रात्री सेक्सची मागणी करतात असे म्हणत पुन्हा एकदा दाक्षिणात्य सिनेसृष्टीत कास्टिंग काऊच कशाप्रकारे चालते यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे. श्री रेड्डीने जेव्हा रस्त्यावर टॉपलेस होत आंदोलन केले तेव्हा तिच्या या भूमिकेला अनेक दाक्षिणात्य अभिनेत्रींनी पाठिंबा दर्शवला.

आपल्या आंदोलनानंतर नुकतीच श्री रेड्डीने एक पत्रकार परिषद बोलावली होती. या पत्रकार परिषदेत दाक्षिणात्य सिनेसृष्टीत मागील दहा वर्षांपासून काम करणाऱ्या अभिनेत्रीने आपले अनुभव सांगितले. सिनेमांमध्ये मला बऱ्याचदा काकू, मावशी किंवा आईच्या भूमिका दिल्या जातात. शूटिंग सुरु असते तोवर निर्माते, दिग्दर्शक मला अम्मा अशी हाक मारतात. रात्र झाली की माझ्याकडे सेक्सची मागणी करतात असा आरोप या अभिनेत्रीने केला आहे.

दुसऱ्या एका अभिनेत्रीने सांगितलेला अनुभवही असाच आहे. जेव्हा सिनेमाचे शुटिंग सुरु असते तेव्हा आम्हाला जाणीवपूर्वक बाहेरच कपडे बदलण्यास भाग पाडले जाते. आमची इच्छा असो किंवा नसो आम्हाला बाहेरच कपडे बदलावे लागतात. कॅराव्हॅन्समध्ये आम्हाला कपडे बदलण्यासाठी जाऊ दिले जात नाही. तसेच आमच्याबद्दल शेलक्या शब्दात शेरेबाजी केली जाते असेही या अभिनेत्रीने सांगितले. ‘इंडिया टुडे’ ने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

दरम्यान कास्टिंग काऊच विरोधात माझा लढा सुरुच राहणार आहे असे श्री रेड्डीने पत्रकार परिषदेत सांगितले. मला बेघर करण्याचा प्रयत्न झाला. माझे आंदोलन मागे घेण्यासाठीही मला सांगण्यात आले मात्र या आंदोलनातून न्याय मिळत नाही तोवर मी आंदोलन करणारच असे श्री रेड्डीने पत्रकारांना सांगितले.

First Published on April 16, 2018 10:51 pm

Web Title: they call me amma in the morning and ask me to sleep with them at night says telugu actress