08 March 2021

News Flash

शरणार्थी म्हणून आले अन् हल्लेखोर बनले

ग्रीसमध्ये येऊन नंतर एक जण पॅरिसमधील हल्ल्यात सामील झाल्याची बाब समोर आली आहे.

ग्रीसमध्ये येऊन नंतर एक जण पॅरिसमधील हल्ल्यात सामील झाल्याची बाब समोर आली आहे. ग्रीसमधील अधिकाऱ्यांनी त्याची शरणार्थी म्हणून नोंद केली होती.

त्यामुळे ग्रीसमध्ये जे शरणार्थी घुसले आहेत त्यांच्या रूपाने आयसिसलाच मदत मिळणार असल्याची भीती व्यक्त केली आहे. एकूण दोन जण ग्रीसमध्ये शरणार्थी म्हणून आले व नंतर पॅरिसच्या हल्ल्यात सामील झाल्याचेही सांगण्यात येत आहे.

फ्रेंच अधिकाऱ्यांनी सांगितले की, पॅरिस हल्ल्यात मरण पावलेल्या एका दहशतवाद्याच्या जवळ सीरियाचा पासपोर्ट सापडला आहे. त्याचे बोटांचे ठसे घेतले असून त्याच्यापुढे पडलेल्या एकाचेही ठसे घेण्यात आले आहेत व ते ग्रीसला पुरवण्यात आले असून त्यावर तपास करण्यास सांगण्यात आले आहे.

हल्ल्याच्या ठिकाणी सापडलेल्या दोघा जणांचा संबंध ग्रीसमधील शरणार्थीशी जोडण्यात येत आहे. दोघांनी ग्रीसमध्ये येताना नोंदणी केली असावी असा अंदाज आहे.

ग्रीसचे नागरी संरक्षण मंत्री निको ऑस्कस यांनी सांगितले की, त्यातील एकाची नोंदणी ऑक्टोबरमध्ये ग्रीसमधील लेरॉस बेटांवर झाली होती.
सीरियन पासपोर्ट ज्याच्याकडे होता
ती व्यक्ती लेरॉस बेटांवर ३ ऑक्टोबरला आली होती व युरोपीय नियमाप्रमाणे नोंदही केली होती. फ्रेंच पोलिसांनी सांगितले की, एका हल्लेखोराच्या मृतदेहाजवळ जो पासपोर्ट सापडला आहे, त्यावरून त्याचा संबंध सीरियाशी आहे.

दहशतवादी हल्ल्यात बळी पडलेल्यांना श्रद्धांजली अर्पण करताना फ्रान्समधील नागरीक. हल्ल्यानंतर पॅरिसमध्ये कडेकोट सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आली होती. लंडनमधील टॉवर ब्रीज, बर्लिन येथील ब्रँडेनबर्ग गेट व न्यूयॉर्कचे वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे राष्ट्रध्वजाच्या रंगातील दिवे चमकावण्यात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 16, 2015 6:00 am

Web Title: they come as refugees then they start attack
Next Stories
1 इस्लाम नव्हे, दहशतवादाविरोधात अमेरिकेचा लढा!
2 पॅरिसमध्ये एकास अटक
3 प्रगतशील देशांना ब्रिक्स बँक आर्थिक मदत देणार-मोदी
Just Now!
X