एलएसीवर भारत चीनदरम्यान सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेनं चीनच्या भूमिकेबाबत इशारा देत भारताशी संबंध अधिक मजबूत करण्यावर भर दिला आहे. दरम्यान, चीनच्या कुरापतींबाबत इशारा देत अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पिओ यांनी भारतासोबत अमेरिकेत्या घनिष्ठ संबंधांचा पुनरूच्चार केला. तसंच भारताला सहकाऱ्याच्या रूपात अमेरिकेची गरज असल्याचंही पॉम्पिओ म्हणाले.

पॉम्पिओ यांची भारत, जपान आणि ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्र मंत्र्यांसह या आठवड्याच्या सुरूवाती जपानमधी टोक्यो येथे उच्चस्तरीय बैठक पार पडली. “या लढाईत त्यांना अमेरिकेला आपला भागीदार आणि सहकारी बनवलं पाहिजे. चीननं आता उत्तरेकजे भारताविरोधात मोठ्या ताकदींना एकत्र आणण्यास सुरूवात केली आहे,” असं ते रेडिओ होस्ट लॅरी ओ कॉनरशी बोलताना म्हणाले. “जग सुजाण आणि सतर्क झालं आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल़्ड ट्रम्प यांनी एक मजबूत युती तयार केली आहे जी या धोक्याचं उत्तर देईल.” असंह पॉम्पिओ यांनी नमूद केलं.

दरम्यान, टोक्योमध्ये झालेल्या उच्चस्तरीय बैठकीनंतर पॉम्पिओ हे संरक्षण मंत्री मार्क एस्पर यांच्यासह भारताच्या दौऱ्यावर येणार आहे. यावेळी ते परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांची भेट घेतील. तसंच उप-परराष्ट्रमंत्री स्टीफन बेग है बैठकीच्या तयारीसाठी पुढील आठवड्यात भारताच्या दौऱ्यावर येणार असल्याचं अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून सांगण्यात आलं. काही महिन्यांपूर्वी गलवान खोऱ्यात भारत आणि चीनच्या जवानांममध्ये झालेल्या हिंसक चकमकीनंतर दोन्ही देशांमधील संबंध कमालीचे ताणले गेले आहेत. या संघर्षादरम्यान चीननं आपल्या जवानांचा मत्यू झाल्याची बाब स्वीकारली असली तरी संख्या मात्र सांगितलेली नाही. तणावाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशात अनेकदा उच्च स्तरीय चर्चा झाल्यानंतरही चीनच्या कुरापती या सुरूच आहेत.