News Flash

ज्योतिरादित्य शिंदेंच्या ग्वाल्हेरमधील महालात दरोडा

मध्य प्रदेशातील जयविलास पॅलेसमध्ये दरोडेखोर घुसले

ज्योतिरादित्य शिंदेंच्या ग्वाल्हेरमधील महालात दरोडा
संग्रहित

भाजपा खासदार आणि ग्वालियरमधील राजघराण्याचे वारसदार ज्योतीरादित्य शिंदे यांच्या महालात दरोडा घालण्यात आल्याचं समोर आलं आहे. मध्य प्रदेशातील जयविलास पॅलेसमध्ये काही दरोडेखोर घुसले होते. स्थानिक पोलिसांनी या वृत्ताला दुजोरा दिला असून दरोडेखोरांनी महालामधील राणी महालमध्ये घुसखोरी केल्याचं सांगण्यात आलं आहे.

पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेतली असून फॉरेन्सिक टीमच्या मदतीने घटनास्थळावरुन पुरावे मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. घटनास्थळी स्निफर डॉगही पाठवण्यात आले आहेत. दरम्यान महालात नेमके किती दरोडेखोर शिरले होते आणि काय सामान चोरी गेलं आहे याची माहिती अद्याप पोलीस घेत आहेत.

ज्योतिरादित्य शिंदेंचा राजेशाही थाट: २० कोटी डॉलर्सचा राजमहाल, ४०० खोल्या, ३५०० किलोचे झुंबर

ग्वालियरचे शहर पोलीस अधीक्षक रतनेश तोमर यांनी दिलेल्या माहितीनुसार, दरोडेखोरांनी बरंच नुकसान केलं आहे. पोलीस याप्रकरणी महालामधील कर्मचाऱ्यांचीदेखील चौकशी करत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 18, 2021 10:44 am

Web Title: thieves break into bjp mp jyotiraditya scindia palace in gwalior sgy 87
Next Stories
1 करोना संकटात भारतीयांची चिंता वाढवणारी बातमी
2 गीता आणि बबिता फोगटच्या बहिणीची आत्महत्या
3 राणी एलिझाबेथ विरुद्ध मेगन मार्कल : ‘शार्ली हेब्दो’चं आणखी एक वादग्रस्त व्यंगचित्र; ब्रिटीश राजघराण्याला म्हटलं वर्णद्वेषी
Just Now!
X