उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंग उन याचा एक फोटो बऱ्याच दिवसांनंतर समोर आला आहे. या फोटोत किम एकदम बारीक झाल्याचं दिसत आहे. त्यानंतर त्याच्या तब्येतीबाबत वावड्या उठू लागल्या आहेत. किम बऱ्याच दिवसांपासून आजारी असल्याच्या सांगण्यात येत आहेत. त्यात या फोटोमुळे भर पडली आहे. गेल्या काही दिवसांपासून सार्वजनिक कार्यक्रमांमध्येही किमचं दर्शन दुर्लभ झालं आहे. त्यामुळे या चर्चा लोकांना खऱ्या वाटू लागल्या आहेत. उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंग उन याचा नोव्हेंबर-डिसेंबर २०२० मधला फोटो आणि आता समोर आलेला फोटा पाहिला तर हा फरक दिसून येत आहे. यात फोटोत त्याने वजन कमी केलं की आजारामुळे बारीक झाला आहे, याबाबत शंका उपस्थित केली जात आहे.

काही दिवसांपूर्वी किम जोंग उन यांची प्रकृती बिघडल्याचं वृत्त समोर आलं होतं. त्यानंतर एका प्रकल्पाच्या उद्घाटनाप्रसंगी सर्वांसमोर येऊन त्यांनी या चर्चांना पूर्णविराम दिला होता. उत्तर कोरियामध्ये सुरू असलेल्या राजकीय हालचालीवर दक्षिण कोरिया नजर ठेवून आहे. ज्यावेळी किम जोंग उन हे कोमात असल्याची माहिती मिळाली त्यानंतर दक्षिण कोरियातील गुप्तचर यंत्रणेची एक बैठक पार पडली. किमची बहिण किम यो जोंग यांच्या हाती सत्ता आल्याच्या वृत्तात आश्चर्य वाटण्याचं कारण नाही. किम यो जोंग या यापूर्वीपासून किम जोंग उन यांच्या पक्षाच्या केंद्रीय समितीची जबाबदारी सांभाळत असल्याची माहिती वृत्तसंस्था योनहापनं दिलं आहे.

“तुम्ही ऐकलं नाहीत, तर वाईट परिस्थिती ओढवेल”, ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांचा काँग्रेला इशारा!

उत्तर कोरियाच्या अध्यक्षपदी किम इल-सुंग यांचा नातू किम जोंग उन आहे. वडिलांच्या मृत्यूनंतर २८ डिसेंबर २०११ रोजी किम जोंगने उत्तर कोरियाचे शासन ताब्यात घेऊन तिथे हुकूमशाही अंमल सुरू केला आहे. १९४८ मध्ये उत्तर कोरियात जे सरकार स्थापन झाले ते सोव्हिएत रशियाच्या आशीर्वादाने- अर्थात कम्युनिस्ट विचारप्रणालीचे. उत्तर कोरियाचे नेते आपल्या राष्ट्राला आत्मनिर्भर कम्युनिस्ट राष्ट्र म्हणवून घेतात. तिथे औपचारिक निवडणुकाही होतात. पण तो दिखावाच असतो.