साडेतीन मुहूर्तांपैकी एक  मुहूर्त असलेल्या अक्षय्य तृतीयेला ज्या लोकांनी सोनं खरेदी करण्याचा प्लॅन केला असेल त्यांचा हिरमोड होण्याची शक्यता आहे. अमेरिकेने सीरियावर केलेल्या हवाई हल्ल्यानंतर पश्चिम आशियाखंडात तणाव निर्माण झालाय, आणि त्याचा परिणाम सोन्या-चांदीवर होऊ शकतो. सोन्याचा भाव फक्त भारतात वाढलेला नाही. तर जगभरात सोन्याचा भाव वाढला आहे. न्यूयॉर्कमध्ये शुक्रवारी सोन्याच्या भावात मोठी वाढ झाली. तसंच चांदीचाही भाव वाढला.

इकॉनॉमिक टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, अहमदाबाद येथे शनिवारी सोन्याचा भाव तोळ्याला ३२, ३०० रुपये इतका होता. विशेष म्हणजे गेल्या कित्येक वर्षातील अक्षय्य तृतीयेचा सोन्याचा हा सर्वाधिक भाव आहे. कारण गेल्या काही वर्षात अक्षय्य तृतीयेला सोन्याचा भाव ३० हजार रुपये प्रति तोळा (१० ग्रॅम)च्या वर कधी गेला नव्हता. दुसरीकडे, चांदीचा भावही ४० हजार प्रतिकिलो झाला आहे.

त्यामुळे, अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधत सोने खरेदी करण्याचा विचार करणा-यांचा हिरमोड होण्याची शक्यता आहे.