‘स्वांतत्र्य दिना’निमित्ती श्रीनगरमध्ये सैनिकांच्या तुकडीने ध्वजारोहण केले, पण त्यातल्याच एका जवानाने मात्र मातृभूमीच्या रक्षणासाठी मरणाला कवटाळले. श्रीनगर मधल्या नौहट्टामध्ये सोमवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफ जवान प्रमोद कुमार हे शहिद झाले, पण त्याआधीच तासाभरापूर्वी त्यांनी इतर जवानांसोबत ध्वजारोहण केले होते. ध्वजारोहण केल्यानंतर काहीच वेळात दहशतवादी हल्ला झाल्याची बातमी त्यांना समजली त्यानंतर इतर जवानांसोबत मिळून त्यांनी या भागात तातडीने धाव घेतली. जवान आणि दहशतवादी यांच्यात झालेल्या चकमकीत प्रमोद यांनी दोन जवानांना ठार केले. परंतु नंतर त्यांच्या मानेवर गोळी लागली.
गेल्याच महिन्यात त्यांची बढती होऊन त्यांना कमांडिंग ऑफिसरचे पद मिळाले होते. त्यांचे पार्थिव आज त्यांच्या मूळ गावी आणण्यात आले. झारखंडमधल्या जामताडा येथील ते रहिवासी आहेत त्यांचा पश्च्यात त्यांची पत्नी आणि सात वर्षांची मुलगी असे  कुटुंब आहे.

सीआरपीएफ जवान प्रमोद कुमार
सीआरपीएफ जवान प्रमोद कुमार