News Flash

केरळमध्ये जावई- सासऱ्यांच्या जोडीची हवा! निवडणुकीत दोघांनीही मारली बाजी

विधानसभा निवडणुकीत दोघेही वेगवेगळ्या मतदारसंघांमधून विजयी झाले आहेत.

केरळमध्ये पहिल्यांदाच जावई आणि सासऱ्याची जोडी निवडणूक लढताना दिसली आणि या दोघांनीही इतिहासात एक नवा अध्यायच जणू लिहिला आहे. हे सासरे म्हणजे केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन आणि जावई म्हणजे पी.ए. मोहम्मद रियास. रियास हे डेमोक्रॅटिक युथ फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत.

रियास हे विजयन यांची मुलगी वीणा यांचे पती असून ते बंगळुरूमधले एक व्यावसायिक आहेत. विजयन हे आपल्या होमपीचवरुन म्हणजे धर्मदाममधून ५०,०००हून अधिक मतांनी विजयी झाले तर रियास हे कोझिकोडेमधला डाव्यांचा बालेकिल्ला असलेल्या बेपोरेमधून निवडून आले आहेत.

याआधी राज्यात अनेक नेत्यांची मुले, मुली निवडणुकीला उभी राहिली होती. मात्र, जावई आणि सासरे हे दोघेही एकत्र उभं राहणं आणि निव़डून येणं हे पहिल्यांदाच घडत आहे. रियास यांनी २००९ सालची लोकसभा निवडणूक लढवली होती. मात्र त्यात ते अयशस्वी ठरले.

विजयन यांची मुलगी वीणा आणि रियास या दोघांनीही १५ जून २०२० रोजी मुख्यमंत्री विजयन यांच्या क्लिफ हाऊस या निवासस्थानी लग्नगाठ बांधली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 3, 2021 4:08 pm

Web Title: this father in law and son in law duo is making history in kerala vsk 98
Next Stories
1 चीनमुळे जगाच्या डोक्याला आणखी एक ताप; ‘ते’ रॉकेट कधीही, कुठेही कोसळण्याची शक्यता
2 बंगालमध्ये निकाल लागताच हिंसाचार; भाजपा, तृणमूलच्या कार्यकर्त्यांसह ४ जणांचा मृत्यू
3 देशात संपूर्ण लॉकडाउन?; टास्क फोर्सने केंद्र सरकारला दिला सल्ला
Just Now!
X