निसर्गाने मुक्तहस्ताने उधळण केलेल्या केरळ राज्यावर सध्या याच निसर्गाचा कोप झाल्याचं पाहायला मिळत आहे. बऱ्याच दिवसांपासून होणाऱ्या अतिवृष्टीमुळे केरळमध्ये महापूर आला असून, आतापर्यंतचा हा शतकातील सर्वात मोठा महापूर असल्याचं म्हटलं जात आहे. सर्वच स्तरांतून केरळसाठी मदतीचा ओघ सुरु झाला असून, अनेकांनीच यात आपलं योगदान देण्यास सुरु केलं आहे. त्यात अॅमेझॉनही मागे राहिलेलं नाही.

बचावकार्यात उपयोगी ठरणाऱ्या काही सामग्रीची ऑनलाईन मागणी करण्याविषयीचे बरेच प्रस्ताव अॅमेझॉनपुढे मांडण्यात आले होते. त्याचच गांभीर्य लक्षात घेत अॅमेझॉनने शुक्रवारपासून ही सेवा पुरवण्यास सुरुवात केली. त्यामुळे आता जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातील व्यक्ती पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे येत त्यांच्या गरजेचे सामान मागवण्याची संधी मिळणार आहे.
अॅमेझॉन इंडिया या अॅपच्या होमपेजवर हा पर्याय उपलब्ध असून, डेस्कटॉप आणि जगातील इतर युजर्ससाठी bit.ly/amazonkerala ही लिंक देण्यात आली आहे. ज्यावर जाऊन ते केरळसाठी मदतीचा हात देऊ शकतात.

अॅमेझॉनवर गेल्यानंतर या पेजवर केरळला तुमची गरज आहे, असं मोठ्या अक्षरांत लिहिलेलं दिसतं. ज्यामुळे परिस्थितीची जाणिव झाल्यावाचून राहात नाही. ‘अतिवृष्टीमुळे केरळमध्ये भूस्खलन आणि पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. ज्यामुळे लाखोंचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. सध्याच्या घडीला तिथे बचावकार्य आणि शिबिरांमध्ये पूरग्रस्तांची गर्दी पाहायला मिळत आहे. याच पूरग्रस्तांच्या मदतीसाठी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन मंडळाशी समन्वय साध अॅमेझॉन इंडियाने एक पाऊल उचललं आहे. आम्हाला विश्वास आहे की तुमच्या सहकार्याने पूरग्रस्तांची मदत करण्यासाठी आम्हीही महत्त्वपूर्ण योगदान देऊ शकू’, असं आवाहन अॅमेझॉनतर्फे करण्यात आलं आहे.

वाचा : निपाहमुळे जीव गमावणाऱ्या नर्सच्या पतीची माणूसकी, पहिला पगार पूरग्रस्तांना

इंटरनेट आणि ऑनलाईन शॉपिंग पोर्टलचं वाढतं प्रस्थ याचा अंदाज घेत हा मार्ग अवलंबण्यात येत असल्याचं कळत आहे. ज्याच्या माध्यमातून युजर्स कोणा एका स्वयंसेवी संस्थेची निवड करुन पुढील मदतकार्यात सहभागी होऊ शकतात. ज्या माध्यमातून मदकार्यात देण्यासाठीच्या सामग्रीची निवड करुन ही यादी कार्टमध्ये जोडली जाते. ज्यानंतर ही यादी तुमच्या गिफ्ट रजिस्टरी अॅड्रेसमध्ये जोडली जाते.

Kerala floods: पूरग्रस्तांच्या मदतीस आयएएस अधिकारी आले धावून; कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांचं सोशल मीडियावर कौतुक

सध्याच्या घडीला हॅबिटाट फॉर ह्युमॅनिटी, वर्ल्ड व्हिजन इंडिया आणि गूँज या महत्त्वाच्या स्वयंसेवी संस्थांनी पुढे येत मदकार्यासाठी अॅमेझॉनशी हातमिळवणी केल्याचं कळत आहे. एकंदरच परिस्थिती पाहता सर्व स्तरांतून केरळमधील परिस्थितीत सुधारणा व्हावी अशीच प्रार्थना करण्यात येत आहे.