News Flash

काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षपदासाठी ‘या’ नेत्याचं नाव स्पर्धेत; सोनिया गांधींची घेतली भेट

मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना भेटण्यासाठी आले आहेत.

सौजन्य- Indian Express

मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना भेटण्यासाठी आले आहेत. कॉंग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधीही सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी १० जनपथ येथे पोहोचल्या आहेत. या अचानक भेटीमुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्क-वितर्क लावण्यात येत आहेत. कॉंग्रेसमधील अंतर्गत कलहाच्या पार्श्वभूमीवर या बैठकीत कमलनाथ यांना मोठी जबाबदारी मिळू शकते तर निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर यांच्याविषयी बैठकीत चर्चा होणार असल्याची सुत्रांची माहिती आहे.

कार्यकारी अध्यक्षपदाबाबत कॉंग्रेस पक्षात गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू आहे. या पदासाठी कॉंग्रेस आपला सर्वात निष्ठावंत आणि ज्येष्ठ नेते कमलनाथ याचा विचार करत आहे. कमलनाथ यांना ही जबाबदारी मिळाली तर ती कॉंग्रेसमधील हा एक मोठा बदल असेल.

सध्या केवळ कॉंग्रेसमध्ये कार्यकारी अध्यक्ष बनवण्याची चर्चा आहे. पावसाळी अधिवेशनानंतर पक्षाचे अध्यक्ष निवडले जातील असे म्हटले जात आहे. तसेच पुढील वर्षी अनेक राज्यात निवडणुका असून कॉंग्रेसमध्येही अनेक प्रकारच्या बातम्या सुरू आहेत. पंजाबमधील कलह देखील अजून संपलेला नाही. कॉंग्रेसमध्ये नाराज नेत्यांचा एक वेगळा गट पडला आहे.
दुसरीकडे बैठकीत प्रशांत किशोर यांच्याबद्दल होत असल्याची अंदाज लावण्यात येत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, प्रशांत किशोर यांनी मंगळवारी कॉंग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष सोनिया गांधी, माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्याशी चार तास चर्चा केली. त्यांना कॉंग्रेसमध्ये मोठ्या पदाची ऑफर देण्यात आल्याचे बोलले जात आहे. त्यांना कॉंग्रेसचा भाग बनून संघटन मजबूत करण्याचे सुचविले आहे. आता प्रशांत किशोर यांना निर्णय घ्यायचा आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 15, 2021 2:55 pm

Web Title: this leader in the race for the post of congress executive president meeting with sonia gandhi srk 94
टॅग : Congress,Rahul Gandhi
Next Stories
1 एलन मस्कनं केलं इस्रोचं कौतुक, कारण…
2 तोडगा निघाला! अमरिंदरच मुख्यमंत्री, सिध्दू प्रदेशाध्यक्ष, पंजाब काँग्रेसचा तिढा सुटला
3 लष्कराला भाजी पुरवणारा निघाला ISI AGENT; पोखरणमधील महत्त्वपूर्ण माहिती पाकिस्तानला दिल्याचा संशय