News Flash

‘या’ व्यक्तीला सर्वप्रथम मिळाली ५० रूपयांची नवी नोट

२००० नंतर ५० रूपयांची नवी नोट चलनात दाखल

लखनऊ : सर्वप्रथम ५० रुपयांची नवी नोट मिळाल्यानंतर आनंद व्यक्त करताना डॉ. रईस.

२००० रुपयांच्या नोटेनंतर आता ५० रुपयांची नवी नोट चलनात दाखल झाली आहे. उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये राहणाऱ्या डॉ. रईस यांनी सर्वप्रथम आपल्याला ही नोट मिळाल्याचा दावा केला आहे. ही नवी नोट जुन्या पाच रुपयांच्या नोटेसारखी दिसत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. रिझर्व्ह बँकेने २०१६ मध्ये नोटाबंदीच्या वेळीच ५० रुपयांनी नवी नोट चलनात आणणार असल्याचे म्हटले होते.

काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारच्या मंत्र्यांनी देखील ५० आणि २०० रुपयांच्या नव्या नोटा लवकरच चलनात येणार असल्याचे सांगितले होते. ८ नोव्हेंबर २०१६ रोजी केंद्र सरकारने ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्या होत्या. या बदल्यात २००० रुपयांची नवी नोट चलनात दाखल केली होती. देशातील काळा पैसा बाहेर काढण्यासाठी हे पाऊल उचलल्याचे केंद्र सरकारने सांगितले होते.

नव्या ५० रुपयांच्या नोटेची वैशिष्ट्ये….
रिझर्व्ह बँकेच्या सांगण्यानुसार, या नोटेचा रंग हा चमकदार फिक्कट निळा आहे. या नव्या नोटांची मालिका महात्मा गांधीच्या प्रतिमेसह असणार आहे. यावर गर्व्हनर ऊर्जित पटेल यांची स्वाक्षरी असणार आहे. याची साईज ६६ मिमी x १३५ मिमी आहे.

नोटेच्या दर्शनी भागावर….
देवनागरीमध्ये आणि इंग्रजीत ५० रुपये असे लिहीले आहे. या नोटेच्या मध्यभागी महात्मा गांधी यांचा फोटो आहे. तसेच अगदी छोट्या अक्षरांमध्ये आरबीआय, इंडिया आणि ५० रुपये असे लिहीले आहे. सुरक्षा धाग्यामध्ये भारत आणि आरबीआय असे लिहीले आहे. नोटेच्या उजव्या बाजूला राजमुद्रा आहे. त्याचबरोबर सर्वात वरच्या डाव्याबाजूला नंबर पॅनलवर छोट्यानंतर मोठे होणारे क्रमांक आहेत. त्याचबरोबर उजव्याबाजूला देखील असाच क्रमांक छापण्यात आला आहे. तसेच म. गाधींच्या फोटोसोबतच ५० आकड्याचा इलेक्ट्रोटाईप वॉटर मार्क आहे.

नोटेच्या मागील भागावर….
नोटेच्या मागच्या बाजूला नोटेच्या छपाईचे वर्ष आहे. त्याचबरोबर घोषणेसहीत ‘स्वच्छ भारत’ चा लोगो आहे. बाजूला भारतीय भाषांचे पॅनल आहे. मध्यभागी हम्पी येथील रथाचा फोटो आहे. तर देवनागरीत ५० असे लिहीण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 25, 2017 2:41 pm

Web Title: this person got new 50 rs note
Next Stories
1 ‘सॅमसंग’च्या उत्तराधिकाऱ्याला भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली ५ वर्षांचा कारावास
2 ५० आणि २०० रूपयांच्या नोटा मिळवण्यासाठी बँकेबाहेर लांबलचक रांगा
3 मला खरेदी करू शकेल अशी टाकसाळ अस्तित्वात नाही, नितीश कुमार यांचे वक्तव्य
Just Now!
X