मी सोशल मीडिया सोडू इच्छितो अशा प्रकारचं एक आश्चर्यकारक ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. काही वेळापूर्वीच केलेल्या एका ट्विटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात, येत्या रविवारपासून मी सोशल मीडिया सोडू इच्छितो. फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम आणि यूट्युब येथील सगळ्या अकाऊंट्समधून बाहेर पडून ही अकाऊंट्स बंद करु इच्छितो असं बुचकळ्यात पाडणारं ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. @narendramodi या ट्विटर हँडलवरुन हे ट्विट करण्यात आलं आहे. याबाबत येत्या रविवारी मी माझी भूमिका स्पष्ट करेन असंही मोदींनी म्हटलं आहे.

 

सोशल मीडियावर सर्वाधिक फॉलोअर्स असलेले नेते म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ख्याती आहे. २०१४ मध्ये भाजपाने सोशल मीडिया अर्थात समाज माध्यमांच्या जोरावर निवडणूक जिंकली होती. आता रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रविवारी काय भूमिका घेणार काय निर्णय घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तूर्तास सोशल मीडिया सोडण्याचा विचार करतो आहे असं ट्विट त्यांनी केलं आहे. त्यांनी हा अंतिम निर्णय घेतलेला नाही. फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम आणि यू ट्युबवरुन आपण बाहेर पडण्याचा विचार करतोय असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे.

सोशल मीडियाचा प्रभावी वापर भाजपाकडून कायमच केला जातो. २०१४ च्या निवडणुका त्यांनी सोशल मीडियाच्या जोरावर भाजपाने जिंकल्या होत्या. त्यानंतरही सोशल मीडियाचा प्रभावी वापर भाजपाकडून केला गेला. लवकरच मोठा निर्णय घेतला जाईल असं ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटबंदीच्या निर्णयाच्या आधी केलं होतं. ज्यानंतर काही वेळातच त्यांनी नोटबंदीचा निर्णय घेतला होता. फक्त हा एकच निर्णय नाही तर इतर अनेक ट्विट आणि पोस्ट आपल्या स्मरणात आहेत ज्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे किती प्रभावी पणे सोशल मीडियाचा वापर करतात हे समोर आलं आहे.

यावेळी मात्र सोशल मीडिया सोडण्याचा विचार करतो आहे या आशयाचं ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सगळ्या नेटकऱ्यांनाच बुचकळ्यात टाकलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबतचा अंतिम निर्णय अद्याप घेतलेला नाही. मात्र येत्या रविवारी ते काय भूमिका घेणार ? काय निर्णय घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.