केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांन आज(मंगळवार)विरोधी पक्षाच्या खासदारांवर संताप व्यक्त केला. कारण, जेव्हा निर्मला सीतारामण या सभागृहात भाषण करत होत्या, तेव्हा विरोधी पक्षाचे खासदार त्यांच्या भाषणात व्यत्यय आणत होते व त्यांच्या सभोवताली गोळा झाले होते. “ही धमकावण्याची ‘फॅशन’ योग्य नाही”, असं निर्मला सीतारमण यांनी म्हटलं आहे. सीतारामण यांनी आज राज्यसभेत दिवाळखोरी संहिता (सुधारणा) विधेयक २०२१ सादर केले.

तसेच, सीतारामण म्हणाल्या की, मंत्री भूपेंद्र यादव यांनी एक मुद्दा मांडला आहे की संसदीय सौजन्य खूप महत्वाचे आहे. तुमच्यात मतभेद असू शकतात, तुम्ही निषेध करू शकता. काही झालं तरी बोलणाऱ्या सदस्यांमध्ये अडथळा निर्माण करणे आणि दबाब आणण्याच्या उद्देशाने त्याच्या सभोवताली जमा होणे तसेच त्याला धमाकवण्याची फॅशन पूर्णपणे अस्वीकार्य आहे.

तर, आर्थिक संकटातील बँकेच्या ठेवीदारांना सरकारने दिलासा दिला आहे. अडचणीतील बँकांमधील खातेदारांच्या ५ लाख रुपयेपर्यंतच्या ठेवी ९० दिवसांत परत करण्याच्या दिशेने सरकारने पाऊल टाकले आहे.याबाबतची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलेली आहे.

याशिवाय, मागील आर्थिक वर्षांत हेतुपुरस्सर कर्ज थकबाकीदार (विल्फुल डिफॉल्टर्स) संख्येने वाढले असल्याची कबुली देखील केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी दिलेली आहे. ३१ मार्च २०२१ अखेर त्यांची संख्या २,२०८ वरून २,४९४ इतकी वाढल्याचे त्या म्हणाल्या होत्या.