News Flash

घरीच राहून कुटुंबीयांसोबत करा योगा! यावर्षीची थीम पंतप्रधान मोदींकडून जाहीर

घरीच राहा करा योगा, मोदींचं आवाहन

अनेक लोक लोक आधी मास्क वापरायचे, वेळोलेळी हात धुवायचे. मीटरभराचे अंतर ठेवायचे. आता मात्र, दुसऱ्या अनलॉकमध्ये जाताना लोकांमध्ये बेजाबदारपणा वाढल्याचे दिसते.

घरीच राहा आणि कुटुंबीयांसोबत करा योगा असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावर्षीची योगा डे ची थीम जाहीर केली आहे. गेल्या काही वर्षांमध्ये योगासनं करणं तरुण वर्गात लोकप्रिय होत चालली आहेत याचा विशेष आनंद होतो आहे आपण यावर्षी ६ वा योग दिवस साजरा करतो आहोत. हा जनतेने सार्वजनिक पद्धतीने साजरा करण्याचा दिवस असतो. मात्र यावर्षी आपल्याला हा योग दिवस सार्वजनिक रित्या साजरा करता येणार नाही. या वर्षीची थीम आहे घरीच राहून कुटुंबीयांसोबत करा योग असल्याचं मोदींनी जाहीर केलं.

दरवर्षी योग दिवस हा मोठ्या उत्साहात आणि जोशात साजरा होता. मात्र यावेळची परिस्थिती तशी नाही. त्यामुळे करोनाच्या आधीच्या काळात आपण ज्याप्रकारे योग दिवस साजरा करत होतो तसा योग दिवस आपल्याला साजरा करता येणार नाही. मात्र प्रत्येकाने घरात राहून योग दिवस साजरा करायचा आहे असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 18, 2020 7:48 pm

Web Title: this years theme is yoga at home yoga with family says pm narendra modi scj 81
टॅग : Yoga
Next Stories
1 दिल्ली सरकार उभारणार २२ फुटबॉल मैदानांच्या आकाराचं जगातील सर्वात मोठं कोविड सेंटर
2 चीनशी लढण्याऐवजी भाजपा काँग्रेसशी लढते, रणदीपसिंग सुरजेवालांचा हल्लाबोल
3 …म्हणून जवानांनी लडाखमध्ये शस्त्रांचा वापर केला नाही, राहुल गांधींना मोदी सरकारने दिलं उत्तर
Just Now!
X