26 November 2020

News Flash

‘..अन्यथा २०२४ नंतर मुस्लिमांना देशाबाहेर जावे लागेल’

भारत हे हिंदू राष्ट्र झाल्यानंतर जे मुस्लिम हिंदूंमध्ये मिळून मिसळून राहतील तेच भारतात राहू शकतील, इतरांना बाहेर जावे लागेल असे भाजपचे बैरिया येथील आमदार सुरेंद्र

| January 15, 2018 03:43 am

भाजपचे बैरिया येथील आमदार सुरेंद्र सिंह

भारत हे हिंदू राष्ट्र झाल्यानंतर जे मुस्लिम हिंदूंमध्ये मिळून मिसळून राहतील तेच भारतात राहू शकतील, इतरांना बाहेर जावे लागेल असे भाजपचे बैरिया येथील आमदार सुरेंद्र सिंह यांनी म्हटले आहे.

शनिवारी रात्री पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की, देशात काही मुस्लिम हे देशभक्त आहेत पण जेव्हा भारत हिंदू राष्ट्र होईल तेव्हा मुस्लिमांना आमच्या संस्कृतीत मिळून मिसळून राहावे लागेल तरच ते देशात राहू शकतील, ज्यांना हे पटत नसेल त्यांनी देशाबाहेर जावे. ते म्हणाले की, पंतप्रधान मोदी हे अवतार पुरूष आहेत. २०२५ मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला १०० वर्षे पूर्ण होत असून २०२४ मध्ये भारत हिंदू राष्ट्र होईल. मोदी यांच्या नेतृत्वाखाली त्याचवेळी भारत हा महाशक्ती झालेला असेल त्यात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचाही वाटा असणार आहे.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर टीका करताना ते म्हणाले की, त्यांच्यात दोन प्रकारची मूल्ये आहेत एक इटालियन व दुसरी भारतीय त्यामुळे ते भारतीय विचारमूल्यांचे नेतृत्व करू शकत नाहीत. त्यांना भारत म्हणजे काय व भारतीयत्व म्हणजे काय याचा मागमूसही नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 15, 2018 3:43 am

Web Title: those muslims will stay in india who embrace hindu culture says bjp mla surendra singh
Next Stories
1 रेल्वेच्या सामानखोली, लॉकर्स सेवेचे दर वाढणार
2 आगामी निवडणुकांतील विजयासाठी भाजपचा दिल्लीत महायज्ञ
3 जागतिक उत्पादन निर्देशांकात भारत तिसाव्या क्रमांकावर
Just Now!
X