News Flash

हजारो ट्रम्प समर्थक वॉशिंग्टन डीसीत एकत्र; राष्ट्राध्यक्षपदाच्या निकालाचा केला निषेध

फलक आणि बॅनर झळकावत 'वुई वॉन्ट ट्रम्प'च्या दिल्या घोषणा

वॉशिंग्टन डीसी : ट्रम्प समर्थकांनी रस्त्यावर उतरुन त्यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली.

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणूक निकालाला विरोध दर्शवत हजारो ट्रम्प समर्थक शनिवारी अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डीसीमध्ये एकत्र जमले होते. यावेळी त्यांनी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना पाठिंबा दर्शवत फलक आणि बॅनर झळकावत घोषणाबाजी केली.

शनिवारी सकाळी व्हाईट हाऊसजवळील फ्रीडम प्लाझा येथे ट्रम्प समर्थक एकत्र जमायला सुरुवात झाली, दुपारपर्यंत तिथे हजारोंच्या संख्येने लोकांची मोठी गर्दी जमली. माजी टी पार्टी कार्यकर्ते अॅमी क्रिमर यांनी या निषेध आंदोलनाचे आयोजन केले होते. यासाठी त्यांनी शुक्रवारी प्लाझा या ठिकाणी आंदोलनासाठी १०,००० लोकांची परवानगी काढली होती. मात्र, प्रत्यक्षात आंदोलनावेळी किती लोक जमले होते याची आकडेवारी समोर येऊ शकलेली नाही.

स्पुटनिक रिपोर्टच्या हवाल्याने एनआयने दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणूक निकालाविरोध आंदोलकांनी ट्रम्प यांना पाठिंबा दर्शवताना ‘फोर मोअर इअर्स’, ‘स्टॉप दी स्टील’, ‘वुई वॉन्ट ट्रम्प’ अशा घोषणा दिल्या. या आंदोलनासाठी ट्रम्प समर्थकांनी सोबत बॅनर्स, फलक आणले होते. यावेळी आंदोलनस्थळी डोनाल्ड ट्रम्प हे देखील दाखल झाले. आपल्या कारमधून खिडकीतूनच समर्थकांना हात उंचावत जनतेचे आभार मानत न थांबता निघूनही गेले.

या आंदोलनामध्ये १० लाखांहून अधिक लोकांनी सहभाग घेतला होता असा दावा ट्रम्प यांचे प्रचार सल्लागार कॅलेग मॅकइनानी यांनी ट्विटद्वारे केला. मात्र, अनेकांनी ही गर्दी हजारांमध्ये असल्याचं म्हटलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 15, 2020 8:56 am

Web Title: thousands of trump fans turn up at washington dc demanding four more years aau 85
Next Stories
1 रामाचे राज्य येऊनही करोनाचा रावण मारला जात नाही, संजय राऊत यांचा मोदींना टोला
2 चिथावणी दिल्यास कठोर प्रत्युत्तर
3 ‘हुरियत’चे भारत-पाकिस्तानला काश्मीरबाबत चर्चेसाठी आवाहन
Just Now!
X