News Flash

जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराच्या ताफ्यावर हल्ला; एक जवान शहीद, दोन जखमी

जवानांची एक तुकडी लष्कराच्या ट्रकमधून प्रवास करीत असताना हा संशयास्पद स्फोट झाला.

संग्रहीत

जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराच्या एका ताफ्यावर हल्ला झाल्याचे वृत्त आहे. या हल्ल्यामुळे झालेल्या स्फोटात एक जवान शहीद झाला असून दोन जवान जखमी झाले आहेत. येथील अखनूर सेक्टरमध्ये ही घटना घडली. जवानांची एक तुकडी लष्कराच्या ट्रकमधून प्रवास करीत असताना हा संशयास्पद स्फोट झाला असे वृत्त एएनआयने लष्करी सुत्र्यांच्या हवाल्याने दिले आहे.

या भीषण स्फोटात तीन जवान गंभीररित्या जखमी झाले होते. त्यांना उपचारांसाठी उधमपूर येथील लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी उपचारांदरम्यान एका जवानाचा मृत्यू झाला. जम्मू काश्मीरच्या पलांवाला सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून नियंत्रण रेषेजवळ आयईडी स्फोटकं पेरण्यात आली होती. लष्कराचा ट्रक या स्फोटकांच्या संपर्कात आल्याने त्याचा स्फोट झाला आणि दुर्घटना घडली असे माध्यमांतील वृत्तांमधून कळते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 17, 2019 5:45 pm

Web Title: three army personnel injured in a suspicious blast in akhnoor sector in jk aau 85
Next Stories
1 “अमित शाह म्हणाले, काळजी करू नका; भाजपा-सेनाच सरकार स्थापन करेल”
2 अयोध्या निकाल : मुस्लीम पर्सनल लॉ बोर्ड न्यायालयाच्या निर्णयाला देणार आव्हान
3 एअर इंडिया, भारत पेट्रोलिअम चार महिन्यांत विकणार; सीतारामन यांची माहिती
Just Now!
X