02 December 2020

News Flash

हॉस्पिटलच्या पार्किंग लॉटमध्ये सामूहिक बलात्कार झाल्याचा महिलेचा आरोप, तिघांना अटक

तपासणी करण्याच्या नावाखाली ते मला...

(संग्रहित छायाचित्र)

एका महिलेने रुग्णालयाच्या पार्किंग लॉटमध्ये तिच्यावर सामूहिक बलात्कार झाल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. नवी दिल्लीच्या रोहिणी भागातील एका रुग्णालयात ही घटना घडल्याची माहिती पोलिसांनी मंगळवारी दिली. तीन आरोपींमध्ये रुग्णालयाचा सुरक्षा रक्षक आणि दोन बाऊन्सर्सचा समावेश आहे.

३०-३१ ऑक्टोबरच्या रात्री रुग्णालयाच्या पार्किंग लॉटमध्ये तिघांनी मिळून माझ्यावर सामूहिक बलात्कार केला, असे पीडित महिलेने पोलिसात नोंदवलेल्या तक्रारीत म्हटले आहे. रोहिणी येथील रुग्णालयात अ‍ॅडमिट असलेल्या एका रुग्णाची सुश्रूषा करण्यासाठी पीडित महिला तिथे आली होती. रुग्णसेवा करणाऱ्यांसाठी शेल्टर होम आहे. तिथे ती थांबली होती, असे पोलिसांनी सांगितले. इंडिया टुडेने हे वृत्त दिले आहे.

आणखी वाचा- पत्नी तरुणाच्या प्रेमात पडली, शालेय शिक्षकाने दोघांची केली हत्या

बाऊन्सर्स आणि सुरक्षा रक्षकांनी मला धमकावले. तपासणी करण्याच्या नावाखाली ते मला रुग्णालयातील निर्जन ठिकाणी पार्किंग लॉटमध्ये घेऊन गेले व माझ्यावर सामूहिक बलात्कार केला असा आरोप महिलेने केला आहे. महिलेच्या तक्रारीवरुन बलात्काराच्या आरोपाखाली पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 3, 2020 12:54 pm

Web Title: three arrested for raping woman in parking lot of delhi hospital dmp 82
Next Stories
1 “लिहून घ्या… नितीश कुमार पुन्हा कधीच मुख्यमंत्री बनणार नाहीत”
2 लोकसभा, राज्यसभेत मिळूनही शंभर खासदार नाहीत; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल
3 ‘मिराज’ फायटर जेटमधून फ्रान्सने केला एअर स्ट्राइक, ५० दहशतवाद्यांचा खात्मा
Just Now!
X