News Flash

फ्रान्समध्ये व्यंगचित्राचा वाद भडकला! अल्ला हू अकबरचे नारे देत चाकू हल्ला; तिघांचा मृत्यू

एका महिलेची गळा चिरून हत्या

फोटो सौजन्य-रॉयटर्स

मोहम्मद पैगंबरांच्या कार्टूनवरुन सुरु झालेल्या वादातून फ्रान्सच्या चर्चमध्ये चाकू हल्ला झाला आहे. यामध्ये एका महिलेसह तिघांची हत्या करण्यात आली आहे. ज्या हल्लेखोराने हत्या केली त्याने आधी अल्ला हो अकबरचे नारे दिले. फ्रान्सच्या नीस शहरात असलेल्या चर्चमध्ये ही घटना घडली. हा एक दशतवादी हल्ला असू शकतो असं फ्रान्समधील पोलिसांनी म्हटलं आहे. रॉयटर्सने यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे. नीस शहराचे महापौर ख्रिश्चियन एस्ट्रोसी यांनी हा हल्ला दहशतवादी हल्ला असल्याचंच म्हटलं आहे.

नीस शहरातल्या नोट्रे डेम चर्चमध्ये हा चाकू हल्ला झाला आहे. हल्लेखोरांना पोलिसांनी अटक केली आहे. आत्तापर्यंत या हल्ल्यात तिघांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये एका महिलेचा समावेश आहे. जिची हत्या गळा चिरुन करण्यात आली आहे. इतर अनेक लोक जखमी आहेत. फ्रान्सच्या एका मंत्र्यानेही महिलेची गळा चिरून हत्या केल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

ज्या हल्लेखोराला पकडण्यात आलं तो सातत्याने अल्ला हू अकबरचे नारे देत होता असंही महापौर ख्रिश्चियन एस्ट्रोसी यांनी सांगितलं. पोलिसांनी हा चाकू हल्ला करणाऱ्यावर गोळ्या झाडल्या आणि त्याला अटकही केली आहे. त्याला हॉस्पिटलमध्ये नेलं जातं आहे, सध्या तो जिवंत आहे. या चाकू हल्ल्यात तीन जणांचा मृत्यू झाला आहे तर अनेकजण जखमी झाले आहेत असं पोलिसांनी सांगितलं आहे. हल्ल्यात ज्या तिघांना हल्लेखोराने मारलं आहे त्या हत्या अत्यंत निर्घृण आहेत असं महापौर यांनी ख्रिश्चियन एस्ट्रोसी म्हटलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 29, 2020 4:13 pm

Web Title: three dead as woman beheaded in knife attack at french church scj 81
Next Stories
1 बँक, सिलिंडर, रेल्वे… १ नोव्हेंबरपासून बदलणार ‘हे’ महत्त्वाचे नियम
2 पाकिस्तानचे लष्करप्रमुख बाजवांना का घाम फुटला होता?, माजी एअर फोर्स प्रमुख म्हणाले…
3 महिलेची हत्या करुन मृतदेहात कपडे भरणाऱ्या आरोपीची फाशी स्थगित; सर्वोच्च न्यायालय म्हणालं…
Just Now!
X