News Flash

डिझायनर मनीष मल्होत्रा, सब्यसाची, रितू कुमार ED च्या रडारवर; लवकरच चौकशी होण्याची शक्यता

या तिघांनाही चौकशीसाठी दिल्लीमधील सक्तवसुली संचलनालयाच्या कार्यालयामध्ये बोलवलं जाण्याची शक्यता असून ईडीनंतर आयकर विभाग या तिघांची चौकशी करेल असं सांगितलं जातंय

पंजाबमधील एका आमदाराच्या चौकशीदरम्यान या तिघांची नावं समोर आली.

केंद्रीय तपास यंत्रणांपैकी एक असणाऱ्या सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) बॉलिवूडमधील तीन नामांकित फॅशन डिझायनर्सवर कारवाई करण्याची तयारी सुरु केलीय. या तिन्ही फॅशन डिझायनर्सने एका बड्या नेत्यासोबत लाखो रुपयांचा रोख व्यवहार केल्याचा, करचोरी केल्याच्या आरोपासंदर्भातील माहिती समोर आली आहे. लवकरच या तिन्ही फॅशन डिझायनर्सला चौकशीसाठी ईडीच्या दिल्लीतील कार्यालयामध्ये बोलवलं जाण्याची शक्यता न्यूज १८ ने दिलेल्या वृत्तात व्यक्त केलीय. ईडीच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रितू कुमार (Ritu Kumar), सब्यसाची मुखर्जी (Sabyasachi Mukherjee) आणि मनीष मल्होत्रा (Manish Malhotra) या तिघांची लवकरच ईडीकडून चौकशी केली जाणार आहे. या तिघांनाही लवकरच ईडीकडून नोटीस पाठवून दिल्लीतील कार्यालयामध्ये चौकशी केली जणार असल्याची माहिती सुत्रांनी दिलीय.

नक्की काय आहे प्रकरण?

सब्यसाची मुखर्जी, मनीष मल्होत्रा आणि रितू कुमार ही तिन्ही नावं भारतीय फॅशन जगतामधील आघाडीची नावं आहेत. बॉलिवूडमधील अनेक बडे कलाकार या फॅशन डिझायनर्सने तयार केलेले कपडे वापरतात. बॉलिवूडबरोबरच देशातील अनेक मोठी कॉर्परेट कुटुंब आणि राजकीय क्षेत्रामध्येही या तिघांची चांगलीच ओळख आहे. या तिघांचं नावं पंजाबमधील एका आमदाराशी संबंधित प्रकरणामध्ये समोर आलं आहे. या आमदाराविरोधात ईडीने मनी लाँण्डरींग कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केलाय. या प्रकरणाच्या चौकशीदरम्यानच या तिन्ही डिझायनर्सची नावं समोर आली आहेत.

तपासादरम्यान काही महत्वाचे पुरावे ईडीच्या हाती लागले आहेत. या पुराव्यांनुसार या आमदाराच्या घरी काही वर्षांपूर्वी एक अलीशान लग्नसमारंभ पार पडला होता. या लग्नसमारंभासाठी या तिन्ही डिझायनर्सकडून कपडे घेण्यात आले होते. लाखो रुपयांच्या या कपड्यांचा व्यवहार कॅशमध्ये करण्यात आला. त्यामुळेच या तिघांविरोधात आयकर विभागाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आणि कर चोरी केल्याचा आरोप करण्यात येत आहे.

ईडीनंतर आयकर विभाग करणार चौकशी

तपास यंत्रणांच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आयकर विभागही लकवरच पंजाबमधील या आमदाराबरोबरच या तीन फॅशन डिझायनर्स आणि त्यांच्या कंपन्यांविरोधात करचोरीचा गुन्हा दाखल करुन शकतात. आता या प्रकरणामध्ये तिन्ही डिझायनर्सची चौकशी केल्यानंतर ईडी यासंदर्भातील आपला अहवाल आयकर विभागाला सोपवले. ईडीच्या कारवाईनंतर आयकर विभाग या प्रकरणाची चौकशी करण्याची शक्यता आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 23, 2021 4:13 pm

Web Title: three designer sabyasachi mukherjee manish malhotra ritu kumar on enforcement directorate radar scsg 91
Next Stories
1 विद्यार्थ्यांचे लैंगिक शोषण करणाऱ्या शिक्षकास अटक, नापास करण्याची दिली होती धमकी
2 मुलांच्या लसीला सप्टेंबरमध्ये मिळू शकते मान्यता; AIIMS च्या प्रमुखांची माहिती
3 विश्वासार्हतेच्या बाबतीत भारतीय माध्यमांनी मारली बाजी, अमेरिकेलाही टाकलं मागे
Just Now!
X