द्रविड मुन्नेत्र कळघम (डीएमके)चे सर्वेसर्वा करुणानिधी यांनी यांचे ज्येष्ठ पुत्र आणि माजी केंद्रीय मंत्री एम़ क़े अळ्ळगिरी यांना पक्षातून निलंबित केल्यानंतरही त्यांना मिळणारा पक्षांतर्गत पाठिंबा उणावलेला नाही़  डीएमकेच्या तीन खासदारांनी अळ्ळगिरी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली़  तसेच गुरुवारी त्यांच्या ६३ व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देणारे फलकही त्यांच्या समर्थकांनी ठिकठिकाणी लावले होत़े
डी़ नेपोलियन, क़े पी़ रामलिंगम आणि ज़े  क़े रितेश यांनी वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला अळ्ळगिरी यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या़  ‘मी अमेरिकेत असताना अळ्ळगिरी यांना निलंबित करण्याची कटू घटना घडली़  परंतु, मी यापुढे अळ्ळगिरी यांच्या कोणत्याही आदेशांचे पालन करीन,’ असे नेपोलियन यांनी या भेटीनंतर सांगितल़े  तर दक्षिण तामिळनाडूमध्ये डीएमके वाढविण्यात अळ्ळगिरी यांनी महत्त्वाची भूमिका बजाविल्याचे रितेश यांनी सांगितल़े
अळ्ळगिरींचे पुत्र दुराई दयानिधी यांनी सांगितले की, पक्षाने डीएमडीकेशी हातमिळवणी करून पराभव पत्करू नय़े  डीएमडीकेशी युती करण्याबाबत अळ्ळगिरी यांनी डीएमकेवर टीका केली होती़  त्यातूनच पुढे त्यांचे निलंबन झाले होत़े