News Flash

छत्तीसगड : ३ दिवसांत ३ जंगली हत्तींचे मृतदेह सापडले, अधिकाऱ्यांना घातपाताचा संशय

एक हत्तीण गर्भवती असल्याचं निष्पन्न

केरळमध्ये गर्भवती हत्तीणीचा स्फोटक भरलेलं अननस खाल्ल्यामुळे मृत्यू झाल्याची घटना काही दिवसांपूर्वी समोर आली होती. प्रसारमाध्यमांमध्ये ही बाब समोर आल्यानंतर सर्वच स्तरातून रोष व्यक्त करण्यात आला होता. यानंतरही देशात हत्तींचे जीव जाण्याचं सत्र सुरुच आहे. गेल्या ३ दिवसांत छत्तीसगडमध्ये ३ हत्तींचा मृत्यू झाल्याचं कळतंय. या ३ हत्तींपैकी एक हत्तीण २० महिन्यांची गर्भवती असल्याचं समोर आलंय. या हत्तींच्या मृत्यूचं खरं कारण अद्याप समजलं नसलं तरीही वन अधिकाऱ्यांनी यामागे घातपाताचा संशय व्यक्त केला आहे.

मंगळवारी सुरजपूर जिल्ह्यात वन अधिकाऱ्यांना एका हत्तीचा मृतदेह सापडला होता. ही हत्तीण गर्भवती असल्याचं तपासाअंती स्पष्ट झालं होतं. यानंतर बुधवारी याच भागात आणखी एका हत्तीचा मृतदेह वन विभागाच्या अधिकाऱ्यांना सापडला. यानंतर गुरुवारी बलरामपूर जिल्ह्यातील गोपाळपूर भागात वन अधिकाऱ्यांना आणखी एक हत्ती मृताअवस्थेत आढळला. सध्या सर्व हत्तींचं शवविच्छेदन सुरु आहे. प्रथमदर्शनी हे सर्व हत्ती सदृढ अवस्थेत दिसत होते. त्यामुळे यांच्यावर विषप्रयोग करुन त्यांना मारण्यात आलं असावं असा अंदाज वन अधिकारी अरुण पांडे यांनी व्यक्त केला.

हत्तींनी जंगलात ज्या ठिकाणी पाणी प्यायलं त्या पाण्याचे काही नमुने वन विभागाने तपासासाठी पाठवले आहेत. गेल्या काही दिवसांपासून माणूस आणि हत्ती यांच्यात अनेकदा संघर्ष झाल्याच्या घटना छत्तीसगडमध्ये समोर आल्या होत्या. केरळमधील घटनेनंतर सर्व देशभरात संतापाची लाट उसळली होती. त्यामुळे छत्तीसगडमधील हत्तीच्या मृत्यूचं नेमकं कारण काय समोर येतंय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 11, 2020 1:28 pm

Web Title: three elephants one pregnant found dead in last three days in chhattisgarh psd 91
Next Stories
1 पालघर मॉब लिंचिंग : सर्वोच्च न्यायालयाचे महाराष्ट्र सरकारला उत्तर सादर करण्याचे निर्देश
2 लोकलसाठी व्होकल होण्याची हीच योग्य वेळ : पंतप्रधान नरेंद्र मोदी
3 विना उत्पन्न निम्मा भारत महिनाभरही तग धरणार नाही
Just Now!
X