News Flash

जम्मू काश्मीरमध्ये तीन ठिकाणी चकमक, एक दहशतवादी ठार, जवानासह एका नागरिकाचा मृत्यू

जम्मू काश्मीरमध्ये गुरुवारी सकाळी तीन ठिकाणी चकमक झाली असून यामध्ये एक दहशतवादी ठार मारला गेला आहे

जम्मू काश्मीरमध्ये तीन ठिकाणी चकमक, एक दहशतवादी ठार, जवानासह एका नागरिकाचा मृत्यू
संग्रहित

जम्मू काश्मीरमध्ये गुरुवारी सकाळी तीन ठिकाणी चकमक झाली असून यामध्ये एक दहशतवादी ठार मारला गेला आहे. यासोबतच एक जवान शहीद झाला असून, एका सामान्य नागरिकाचा मृत्यू झाला आहे. श्रीनगरपासून 58 किमी अंतरावर असणाऱ्या अनंतनाग जिल्ह्यातील डूरु येथे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक उडाली. या चकमकीत एका दहशतवाद्याला ठार करण्यात आलं, तर एक जवान शहीद झाला. अजून काही दहशतवादी लपले असल्याची शक्यता असून सुरक्षा जवानांनी सर्च ऑपरेशनला सुरुवात केली आहे.

‘माहिती मिळाल्यानंतर हे ऑपरेशन लाँच करण्यात आलं होतं. आम्ही एका जवानाला गमावलं असून, एक दहशतवाद्याचा खात्मा करण्यात यश मिळालं आहे’, अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली आहे.

चकमक सुरु असल्याने अनंतनाग, श्रीनगर आणि बडगाम जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.

श्रीनगरमधील नूरबाग परिसरात सुरक्षा जवानांना गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे सर्च ऑपरेशनला सुरुवात केली असता चकमकीला सुरुवात झाली. गुप्तचर यंत्रणांनी काही दहशतवादी एका घरात लपले असल्याची माहिती दिली होती. सर्च ऑपरेशनदरम्यान दहशतवाद्यांनी गोळीबाराला सुरुवात केली. चकमकीत घरमालकाचा मृत्यू झाला आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी घरातून पळ काढला असून जवळच्या ठिकाणीच लपून बसले आहेत. त्यांचा शोध घेण्यासाठी सर्च ऑपरेशन सुरु आहे.

तिसऱ्या चकमकीत, सुरक्षा जवाना बडगाम जिल्ह्यात एका धार्मिक स्थळाचा ताबा घेणाऱ्या दहशतवाद्यांना पकडण्याचा प्रयत्न करत आहेत. एका घरात लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी पळ काढल्यानंतर या धार्मिक स्थळाचा ताबा घेतला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 27, 2018 7:41 am

Web Title: three encounters broke out in jammu kahsmir
Next Stories
1 साखर निर्यातीसाठी केंद्राचे साडेपाच हजार कोटी
2 एक चुकीचं स्पेलिंग आणि…; तुम्हाला Googleच्या नावामागची गोष्ट माहित्ये का?
3 देशात २१.०८ कोटी जणांची पॅन -आधार क्रमांक जोडणी
Just Now!
X