मालगाडीने दिलेल्या धडकेत दोन सिंह आणि एका सिंहिणीचा मृत्यू झाला आहे. गुजरातमधील अमरेली मध्ये ही घटना घडली आहे. मंगळवारी उशिरा ही घटना घडली आहे. गीर जंगलाच्या पूर्व भागातले हे सिंह होते असे समजते आहे. सावरकुंडला भागात हा अपघात झाला आहे. रात्री 12.30 च्या नंतर मालगाडी रूळावरून जात होती. त्याचवेळी एकूण सहा सिंह रूळ ओलांडत होते. त्यातले तीन सिंह रूळ ओलांडून पुढे गेले. तर दोन सिंह आणि एक सिंहिण यांना मालगाडीची धडक लागली. सिंहांचे वय दोन वर्षे होते तर सिंहिणीचे वय दीड वर्षे होते अशी माहिती गीर जंगल विभागाचे प्रवक्ते डी. टी. वसवदा यांनी दिली आहे. हा सगळा प्रकार दुर्दैवी आहे अशीही प्रतिक्रिया वसवदा यांनी दिली आहे.