News Flash

आणखी तीन राफेल विमानं भारतात दाखलं; ७००० किमीचं अंतर केलं पार

हवेतचं इंधन भरण्याची केली कमाल

आणखी तीन राफेल विमानं भारतात दाखलं; ७००० किमीचं अंतर केलं पार
नवी दिल्ली : राफेलची तीन विमानांची तीसरी बॅच भारतात दाखल झाली.

फ्रान्सकडून विकत घेतलेली अत्याधुनिक राफेल लढाऊ विमानांची तिसरी बॅच गुरुवारी भारतात दाखल झाली. नॉनस्टॉप ७००० किमीचं अंतर या विमानांनी पार केलं. दरम्यान, हवेतचं या इंधन भरण्याची कमालही या विमानांनी केली. भारतीय हवाई दलानं बुधवारी ही माहिती दिली.

फ्रान्सच्या इस्ट्रेस एअर बेसवरुन निघालेली ही तीन विमानांची बॅच भारतातील एअर बेसवर दाखल झाली. या विमानांमध्ये इंधन भरण्यासाठी युएई एअर फोर्सने पाठवलेल्या इंधन टँकरसाठी भारताने ट्विटद्वारे आभार मानले.

भारताने फ्रान्सकडून एकूण ३६ राफेल विमानं विकत घेतली आहेत. यांपैकी आत्तापर्यंत भारतात तीन बॅचमध्ये एकूण ९ विमानं दाखल झाली आहेत. येत्या मार्चमध्ये तीन आणखी राफेल विमानं भारतात दाखल होणार आहेत. त्यानंतर एप्रिल महिन्यांत आणखी सात विमानं येतील. पाच विमानांची पहिली बॅच भारतात २८ जुलै रोजी दाखल झाली होती. त्यानंतर नोव्हेंबरमध्ये विमानांची दुसरी बॅच भारतात दाखल झाली होती.

राफेलनं प्रजासत्ताक दिनी केलं शक्तीप्रदर्शन

भारतात दाखल झालेल्या या अत्याधुनिक राफेल लढाऊ विमानांनी पहिल्यांदा यंदाच्या प्रजासत्ताक दिनी राजपथावर आकाशात आपलं शक्तीप्रदर्शन केलं. अनेक कसरती करत या विमानांनी आपल्या ताकदीचे प्रदर्शन घडवले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 27, 2021 9:52 pm

Web Title: three more raphael planes landed in india crossed a distance of 7000 km aau 85
Next Stories
1 शेतकरी नेत्यांनी वचन पाळलं नाही, दोषींना सोडणार नाही – दिल्ली पोलीस
2 चित्रपटगृहे, स्विमिंग पूल जास्त क्षमतेनं वापरता येणार; केंद्रानं दिली परवानगी
3 ‘कोव्हॅक्सिन’मध्ये नव्या स्ट्रेनवर प्रभावी ठरणारी अ‍ॅन्टीबॉडी क्षमता तयार; ICMRच्या संशोधनातील निष्कर्ष
Just Now!
X