News Flash

छत्तीसगडमध्ये तीन नक्षलवाद्यांचा खात्मा; तेलंगणामध्ये ३३ नक्षलींचे आत्मसमर्पण

मोठ्याप्रमाणावर शस्त्रसाठा हस्तगत

छत्तीसगडमधील कांकेर येथील ताडोकी पोलीस ठाणे हद्दीत झालेल्या चककमती जवानांनी तीन नक्षलवाद्यांचा खात्मा केला. यावेळी मोठ्याप्रमाणावर शस्त्रसाठा देखील हस्तगत करण्यात आला.

याशिवाय आज तेलंगणामध्ये देखील नक्षलविरोधी मोहिमेस आज यश आले आहे. येथील कोथगुडेम पोलिसांसमोर ३३ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्ण देखील केले.

देशातील नक्षलवादावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आपलं लक्ष्य केंद्रीत केलं आहे. नक्षलवाद्यांची समस्या समूळ नष्ट करण्यासाठी नवी योजना आखण्याच्या ते तयारीत आहेत. तसेच नक्षलवाद्यांचे अड्डे संपवू शकत नसलेल्या सुरक्षा दलांची माहितीही मागवली असल्याची माहिती समोर आली होती. तसेच, या अगोदर गृहमंत्र्यांनी या पार्श्वभूमीवर घेतलेल्या आढावा बैठकीत केंद्रीय पॅरामिलिटरी फोर्स, केंद्रीय गुप्तचर यंत्रणा आणि पाच राज्यांतील सरकारी अधिकाऱ्यांचा समावेश होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 23, 2020 9:06 pm

Web Title: three naxals killed in an exchange of fire with security forces and 33 naxals surrendered msr87
Next Stories
1 ‘लव्ह जिहाद’बद्दल खासदार नुसरत जहाँ यांनी मांडली भूमिका, म्हणाल्या…
2 आसामचे माजी मुख्यमंत्री तरूण गोगोई यांचे निधन
3 ‘या’ चार राज्यांमधून हवाईमार्गे महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांना कोविड टेस्ट सक्तीची
Just Now!
X