उधमपुरात जम्मू-श्रीनगर महामार्गावर सीमा सुरक्षा दलाच्या वाहनांच्या ताफ्यावर हल्ला झाला त्यावेळी परिसरात एकच खळबळ उडाली. महामार्गालगत असलेल्या डोंगररांगात छोटी छोटी गावे आहेत. सुरक्षा दलांशी चकमक सुरू असतानाच मोहम्मद नावेद या दहशतवाद्याने तेथून पळ काढत एका गावात आश्रय घेतला. गावातील राकेशकुमार, विक्रमजीत व देसराज शर्मा या तिघांना नावेदने ओलिस ठेवले. प्रथमत त्याने बंदुकीचा धाक दाखवत या तिघांनाही गावातील एका शाळेत नेले. सुदैवाने शाळा रिकामी होती. नावेदची दिशाभूल करत या तिघांनीही त्याला अखेरीस जेरबंद करत पोलिसांच्या हवाली केले.
नावेदने ओलिस ठेवलेल्या राकेश कुमार याने सांगितले की, आपण घराबाहेर पडलो असता गोळीबाराचे आवाज आले व या अतिरेक्याने त्याच्याबरोबर चलण्यास सांगितले. त्याआधीच त्याने तीन-चार लोकांना ओलिस ठेवले होते. लष्कर व पोलिस यांनी शाळेला सुरक्षा कडे केले होते.
दुसरा ओलिस विक्रमजीत याने सांगितले की, आम्हाला बंदुकीच्या धाकाने सुटकेचा मार्ग विचारण्यात आला. अतिरेक्याने रस्ता दाखवला नाही तर कुटुंबाला मारण्याची धमकी दिली व काही अन्नही देऊ केले.
देसराज शर्मा यांनी
नावेदला झुंज देण्याचा प्रयत्न केला. मात्र, नावेदने त्यांना मारले. विक्रमजीत व राकेश त्याचाशी झटापट करत होते. विक्रमजीतने सांगितले की, मी त्याची मान पकडली तर राकेशने बंदूक पकडली. नंतर त्याने गोळीबार केला पण आम्ही वाचलो. नंतर त्याला पकडले.
सुदैवाने शाळेत विद्यार्थी नव्हते कारण काश्मीरमध्ये आयुर्विज्ञान संस्था स्थापण्याच्या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे. अतिरेक्याकडून दारूगोळा
व एके ४७ रायफली जप्त
करण्यात आल्या.