म्यानमार सीमेनजिक असलेल्या मणिपूरमधील चंदेल जिल्ह्यात दहशतवाद्यांनी आसाम रायफल्सच्या जवानांवर घातकी हल्ला केला. या हल्ल्यात आसाम रायफल्सचे तीन जवान शहीद झाले आहेत. पीपल्स लिबरेशन आर्मी या संघटनेच्या दहशतवाद्यांनी हा हल्ला केला असून, यात सहा जवानही गंभीर जखमी झाले आहेत. दहशतवाद्यांनी आधी आयईडीचा स्फोट घडवून आणला. त्यानंतर जवानांवर अंधाधूंद गोळीबार केला. या घटनेनंतर लष्करानं परिसरात दहशतवाद्यांना पकडण्यासाठी शोध मोहीम हाती घेतली आहे.

मणिपूरमधील चंदेल जिल्ह्यात म्यानमार सीमेलगतच्या भागात दहशवाद्यांनी आसाम रायफल्सच्या जवानांना लक्ष्य केलं आहे. स्थानिक पीपल्स लिबरेशन आर्मीच्या दहशतवाद्यांनी जवानांवर हल्ला केला. दहशतवाद्यांनी आधी बॉम्बस्फोट घडवून आणला. त्यानंतर जवानांवर गोळीबार केला. या हल्ल्यात आसाम रायफल्सचे तीन जवान शहीद झाले आहेत. सहा जवान गंभीर जखमी झाले आहेत.

घटना घडलेला परिसर अधिकार क्षेत्रात येणाऱ्या एका पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं की, “आसाम रायफल्सची तुकडी सीमेलगत असलेल्या खोंगटाळ येथील त्यांच्या छावणीवर जात होती. त्यावेळी आयईडीचा भयंकर स्फोट झाला. त्यानंतर दहशतवाद्यांनी गोळीबार केला. सकाळी साडे सहा वाजता ही घटना घडली.”

मणिपूरमधील चंदेल जिल्ह्यात लष्कराच्या जवानांवर दहशतवाद्यांनी हल्ला केल्याची घटना आज घडली. अतिरेक्यांनी आधी स्फोट केला. त्यानंतर जवानांवर गोळीबार केला. यात तीन जवान शहीद झाले, तर सहा जवान जखमी झाले आहेत. शहीद झालेल्या जवानांची ओळख पटवण्यात आली आहे. हवालदार प्रणय कलिता (आसाम), रायफलमॅन मिठा कोन्याक (नागालँड) व रायफलमॅन रतन सलाम (मणिपूर) अशी शहीद झालेल्या जवानांची नावं आहेत.

हल्ल्यानंतर लष्करानं दहशतवाद्यांच्या शोध घेण्यासाठी शोध मोहीम सुरु केली आहे. त्याचबरोबर भारत-म्यानमार सीमेवरील सुरक्षा व्यवस्थाही वाढवण्यात आली आहे. मागील वर्षीही नोव्हेंबर महिन्यात चंदेल जिल्ह्यात आसाम रायफल्सच्या छावणीवर हल्ला करण्यात आला होता. त्यावेळी दहशतवाद्यांनी छावणीवर बॉम्ब फेकले होते.