श्रीनगरमध्ये एका दहशतवाद्याने केलेल्या गोळीबारात शुक्रवारी दोन नि:शस्त्र पोलिसांचा मृत्यू झाला. तर बडगाम आणि शोपियाँ जिल्ह्य़ांमध्ये झालेल्या दोन चकमकींमध्ये तीन दहशतवादी ठार झाले, तर एक पोलीस शहीद झाला. श्रीनगरमध्ये विमानतळाकडे जाणाऱ्या मार्गावर दोन पोलीस बंदोबस्तावर होते. त्यांच्यावर साकीब नावाच्या दहशतवाद्याने गोळीबार केल्याचे जम्मू-काश्मीरचे पोलीस प्रमुख दिलबाग सिंह यांनी सांगितले.
बडगाम जिल्ह्य़ातील दुसऱ्या घटनेत दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केला. त्यामध्ये दोन पोलीस जखमी झाले. त्यातील एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर शोपियाँ जिल्ह्य़ातील बदिगाम येथे सुरक्षा दलांनी तीन दहशतवाद्यांना ठार केले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 20, 2021 12:25 am