21 October 2020

News Flash

श्रीनगरमध्ये तीन दहशतवाद्यांचा खात्मा, एक जवान शहीद

काल रात्रीपासून चकमक सुरू

श्रीनगरमधील पंथा चौक परिसरात जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. यामध्ये आतापर्यंत तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. तर, एक जवान शहीद झाला असल्याची माहिती समोर आली आहे. काल रात्रीपासून या परिसरात चकमकीस सुरूवात झालेली आहे.

प्राप्त माहितीनुसार, या चकमकीत शहीद झालेल्या जवानाचे नाव एएसआय बाबू राम असे आहे. दहशतवाद्यांच्या गोळीबारात जखमी झाल्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, त्या ठिकाणी अखेर त्यांचा मृत्यू झाला. शनिवारी रात्री दुचाकीवर आलेल्या दहशतवाद्यांकडून सीआरपीएफच्या 61 बटालियन व पोलिसांच्या संयुक्त पथकावर गोळीबार करण्यात आला व त्यानंतर त्यांनी घटनास्थळावरून पळ काढला होता.

यानंतर जवानांनी संपूर्ण परिसरास नाकाबंदी करून शोधमोहीम सुरू केली होती. दरम्यान, येथील एका घरात दडून बसलेल्या दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार सुरू केला. प्रत्युतरात जवानांनी केलेल्या गोळीबारात तीन दहशतवादी ठार झाले असल्याची माहिती मिळाली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 30, 2020 8:33 am

Web Title: three terrorists gunned down by security forces one police personnel lost his life msr 87
Next Stories
1 रशियातील लष्करी कवायतींमध्ये सहभागी न होण्याचा भारताचा निर्णय
2 फ्युचर किराणा समूहावर रिलायन्सचा ताबा 
3 शैक्षणिक सत्राला अंशत: अनुमती!
Just Now!
X