22 October 2020

News Flash

बारामुल्लामध्ये तीन दहशतवाद्यांचा खात्मा

मागील चार दिवासांत सहा दहशतवाद्यांना ठार करण्यात यश

संग्रहीत छायाचित्र

जम्मू-काश्मीरमधील बारामुल्लामधील क्रिरी सेक्टरमध्ये तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. यामध्ये उत्तर काश्मीरमधील लष्कर ए तोयबा या दहशतवादी संघटनेचा महत्वाचा कमांडर सज्जाद हैदर, त्याचा पाकिस्तानमधील साथीदार उस्मान आणि स्थानिक सहाय्यक अनायतुला यांचा समावेश आहे. जम्मू-काश्मीरचे डीजीपी दिलबाग सिंह यांनी ही माहिती दिली आहे.

मागील चार दिवसांत दशतवाद्यांविरोधात तीन मोहिमा राबवण्यात आल्या, ज्यामध्ये सहा दहशतवाद्यांचा खात्मा झाला. त्यातील चार दहशतवाद्यांचा काश्मीरमधील टॉप टेन दहशताद्यांमध्ये समावेश होता. जवानांनी केलेली ही कारवाई नक्कीच कौतुकास्पद आहे. यामुळे स्थानिक नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. सज्जाद हैदरने अनेक तरुणांना कट्टरवादी बनवले होते, असेही डीजीपी दिलबाग सिंह  म्हणाले.

या अगोदर तीन दिवसांपूर्वी बारामुल्ला येथे जवान व दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत, लष्कर ए तोयबाचा कमांडर सज्जादचा खात्मा करण्यात आला होता. तसेच, अन्य दोन दहशतवाद्यांचा खात्मा देखील करण्यात देखील जवानांना यश आले होते. या करावाई अगोदर सोमवारी सकाळी सीआरपीएफ आणि जम्मू-काश्मीर पोलिसांच्या संयुक्त गस्ती पथकावर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलातील (सीआरपीएफ) दोन जवान आणि जम्मू-काश्मीर पोलीस दलातील एक स्पेशल पोलीस ऑफिसर (एसपीओ) शहीद झाले होते.

जम्मू-काश्मीरमधील कुंपवाडा व हंदवाडा जिल्ह्यात काल झालेल्या चकमकीत जवानांनी लष्कर ए तोयबाच्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. या दोघांकडील मोठ्याप्रमाणावर शस्त्रसाठा हस्तगत करण्यात आला आहे. ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्यांमध्ये नासीर-उद-दीन-लोन या लष्कर ए तोयबाच्या कमांडरचा समावेश आहे. त्याचा सीआरपीएफच्या जवानांवरील ह्ल्ल्यामध्येही सहभाग होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 20, 2020 1:49 pm

Web Title: three terrorists were killed in kreeri baramulla msr 87
Next Stories
1 लसीचाही कुटनीतीसाठी वापर: भारत करोना विरोधी लसीचा बांगलादेशला प्राधान्याने करणार पुरवठा
2 “लसीसंदर्भातील राष्ट्रवाद आणि देशांमधील स्पर्धा थांबवली पाहिजे, अन्यथा….,” WHO ने व्यक्त केली भीती
3 काँग्रेसचे नेते नितीन राऊत यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी घेतलं ताब्यात
Just Now!
X