01 March 2021

News Flash

तामिळनाडूत भररस्त्यात थरार; हल्लेखोरांनी तरुणाचं शीर केलं धडावेगळं!

ही सगळी घटना एका व्यक्तीनं आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद केली

(संग्रहित छायाचित्र)

तामिळनाडूमधील मदुराई शहरात सोमवारी भररस्त्यात एक अतिशय थरारक घटना घडली. काही शस्त्रधारी हल्लेखोरांनी एका तरुणावर हल्ला करत त्याचं शीर धडावेगळं केलं. त्यानंतर हे कापलेलं शिर त्यांनी एका चर्चच्या बाहेर फेकून दिलं. ही सगळी घटना घटनास्थळी असलेल्या एका व्यक्तीनं आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद केली. दरम्यान, संशयीत आरोपींना अटक केल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, मदुराईतील किझहावसाल येथील एका रहदारीच्या रस्त्यावर सोमवारी ही घटना घडली. मुरुगनंदम नामक एक व्यक्ती या गर्दीतील रस्त्यावरुन पायी निघाली होती. यावेळी अचानक काही शस्त्रधारी तरुणांनी एका कारमधून येऊन मुरुगनंदम यांना थांबवलं. त्यानंतर त्यांच्यावर हल्ला चढवत एका धारदार शस्त्रानं त्याचं शिर धडावेगळं केलं.

दरम्यान, ही थरारक घटना घडत असताना जवळच असलेल्या एका व्यक्तीनं आपल्या मोबाईल कॅमेरॅत याचं चित्रीकरण केलं. नक्की काय घडलं याचं सविस्तर चित्रण या मोबाईल कॅमेरॅत झालं आहे. या कॅमेरॅतील दृश्यानुसार, शस्त्रधारी टोळीनं मुरुगनंदम यांच्यावर अचानक हल्ला चढवला आणि त्यांचे शिर धडावेगळं केलं तसेच हे कापलेलं शिर त्यांनी सेंट मेरीज चर्चबाहेर फेकून दिलं.

या घटनेची खबर मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि तापस सुरु केला. घटनास्थळावरुन पोलिसांनी हल्लेखोरांनी वापरलेली कार जप्त केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 16, 2020 2:21 pm

Web Title: thrills abound in tamil nadu the attackers beheaded the youth aau 85
Next Stories
1 केदारनाथमध्ये बर्फवृष्टी, योगी आदित्यनाथ, रावत यांच्यावर अडकून पडण्याची वेळ
2 नितीश कुमारांच्या शपथविधीस तेजस्वी यादव जाणार नाहीत
3 बिहारच्या उपमुख्यमंत्रीपदाबाबत तारकिशोर प्रसाद यांनी केलं महत्वाचं विधान
Just Now!
X