पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबादमध्ये आज(बुधवार) भाजपा प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांच्या वाहनावर हल्ला झाला. त्यांच्या वाहनावर काही जणांकडून दगडफेक करण्यात आली. विशेष म्हणजे यावेळी दिलीप घोष यांच्या वाहनांच्या ताफ्यासमोर पोलिसांचे वाहन देखील होते. दिलीप घोष यांनी तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर हल्ल्याचा आरोप केला आहे. १५ दिवसांच्या आत दिलीप घोष यांच्या वाहन ताफ्यावर झालेला हा दुसरा हल्ला आहे.
दिलीप घोष यांनी ट्विटद्वारे याबाबत माहिती देताना सांगितले की, ”मुर्शिदाबादमधील कांडी येथे आज दुपारी ३ वाजून ४५ मिनिट व पुरंदरपुर येथे ५ वाजून ३२ मिनटांनी टीएमसीच्या गुंडांनी काळे झेंडे दाखवले व माझ्या वाहनावर दगडफेक केली. हताश आणि निराश टीएमसी आता शेवटचा प्रयत्न म्हणून राजकीय दहशतवादाचा प्रयत्न करत आहे.”
Today at Kandi (3.45 PM) and Purandorpur (5.32 PM) in Murshidabad, Trinamool’s goons showed black flags and and attacked with sticks and bricks on my car.
The dying ,despondent and frustrated TMC is now trying #PoliticalTerrorism as a last effort.— Dilip Ghosh (@DilipGhoshBJP) November 25, 2020
तसेच, या प्रकरणी पश्चिम बंगालचे भाजपा प्रभारी कैलाश विजयवर्गीय यांनी देखील ट्विट केलं आहे. त्यांनी म्हटलं आहे की, मुर्शिदाबादमध्ये जिथं माझ्या वाहनाला काही विशिष्ट वर्गाच्या समाजकंटकांनी घेरलं होतं. तिथं आज दिलीप घोष यांच्या वाहनावर हल्ला झाला आहे. आश्चर्याची गोष्ट आहे की त्यांच्या वाहनाच्या मागे जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांची देखील गाडी होती.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on November 25, 2020 9:46 pm