25 February 2021

News Flash

‘रणथंबोर’मधील थरार; जेव्हा वाघ पर्यटकांच्या गाडीचा पाठलाग करतो

वाघ शेवटपर्यंत पर्यटकांच्या मागावरच होता

वाघासाठी प्रसिद्ध असलेल्या राजस्थानातील रणथंबोर अभरण्यातील अंगावर शहारे आणणारा एक व्हिडीओ समोर आला आहे. अभरण्यात फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांच्या गाडीमागे वाघानं पाठलाग सुरू केला. विशेष म्हणजे त्या वाघाला चुकवण्यासाठी पर्यटकांनी गाडी परत मागे घेतली. मात्र, वाघ त्यांच्या मागावरच होता.

सवाई मधोपूर जवळ असलेल्या रणथंबोर राष्ट्रीय अभरण्यात अनेक पर्यटक व्याघ्र दर्शनासाठी येतात. देशातील नामांकित व्याघ्र प्रकल्पापैकी हे एक अभयारण्य आहे. दरम्यान, १ डिसेंबर रोजी रणथोबर अभयारण्यात काही पर्यटक गाडीतून फिरत होते. यावेळी अचानक झाडीतून आलेल्या वाघानं त्यांच्या गाडीचा पाठलाग सुरू केला. त्यानंतर या वाघाला चुकवण्यासाठी पर्यटकांनी गाडीची दिशा बदलली. मात्र, वाघ गाडीमागेच धावत होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 2, 2019 4:19 pm

Web Title: tiger chases a tourist vehicle in ranthambore national park bmh 90
Next Stories
1 चार दिवसांच्या कार्यक्रमासाठी योगी सरकार करणार ६३ हजार झाडांची कत्तल
2 अयोध्या खटला: जमियत उलेमा-ए-हिंदकडून सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका दाखल
3 आता काशी-मथुरा रडारवर: कायदा बदलण्याची सुब्रमण्यम स्वामींची मागणी
Just Now!
X