लडाख सीमेवरील धुमश्चक्रीनंतर भारत-चीन यांच्यात निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने केंद्र सरकारने ५९ चिनी अॅपवर बंदी घातली असून यामध्ये टिकटॉकचाही समावेश आहे. यानंतर टिकटॉकच्या सीईओने भारतातील आपल्या कर्मचाऱ्यांसाठी पत्र लिहिलं आहे. केविन मेयर यांनी आपल्या पत्रातून कर्मचाऱ्यांना इंटरनेटचे लोकशाहीकरण करण्यासाठी आपण प्रयत्न करत असून मोठ्या प्रमाणात त्याला यशही मिळालं असल्याचं म्हटलं आहे. तसंच आपण आपल्या संकल्पासाठी कटिबद्द आणि वचनबद्द राहूयात. भागधारकांची चिंता दूर करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत असं आवाहन यावेळी त्यांनी केलं आहे.

“टिकटॉक भारतीय कायद्यानुसार सर्व डेटा गोपनीयता आणि सुरक्षेच्या नियमांचे पालन करत असून आणि वापरकर्त्याची गोपनीयता आणि अखंडता यांना सर्वाधिक महत्त्व दिलं जात आहे,” असंही केविन यांनी पत्रातून सांगितलं आहे. केविन टिकटॉकचे मुख्य कार्यकारी तसंच बाइटडान्सचे मुख्य ऑपरेशन अधिकारीदेखील आहेत. कंपनीच्या वेबसाईटवर त्यांनी ही पोस्ट प्रसिद्द केली आहे. ‘भारतीय कर्मचाऱ्यांसाठी संदेश’ असं या पोस्टचं शिर्षक असून केविन यांनी भारतातील २० कोटी युजर्सना आपला आनंद, क्रिएटीव्हिटी, अनुभव जगापर्यंत पोहोचवता यावेत यासाठी आम्ही खूप मेहनत घेतली असं सांगितलं आहे.

Two houses destroyed, cylinder explosion,
देव तारी त्याला कोण मारी… सिलिंडरच्या स्फोटात दोन घर खाक, तान्हुले बाळ बचावले
Pimpri, Kiwale, pimpri mnc,
पिंपरी : किवळेतील दुर्घटनेनंतर पालिकेला जाग; होर्डिंगधारकांना दिला ‘हा’ इशारा
Indians in Cambodia cyber scams
सायबर गुन्हेगारीत अडकलेल्या ७५ भारतीयांची कंबोडियातून सुटका; ६ महिन्यात ५०० कोटी लुटले
Afgan Women
‘व्याभिचार केल्यास महिलांना खुलेआम दगडाने ठेचून मारले जाणार’ तालिबानची घोषणा

आणखी वाचा- ‘तो’ आरोप चुकीचा, भारत सरकारने बंदी घातल्यानंतर TikTok चा खुलासा

“आमचे कर्मचारी आमची मोठी ताकद असून त्यांची काळजी घेणं आमची प्राथमिकता आहे,” असं केविन यांनी सांगितलं आहे. केविन यांनी यावेळी आपल्या दोन हजार कर्मचाऱ्यांना अभिमान वाटेल असा सकारात्मक अनुभव आणि संधी अनुभवण्यासाठी जे काही लागेल ते करण्याचं आश्वासन दिलं आहे. केविन यांनी यावेळी पुन्हा एकदा डिजिटल इंडियामध्ये सक्रीय भाग नोंदवण्याकडे आपण लक्ष ठेवून असल्याचंही सांगितलं आहे.

आणखी वाचा- ५९ अ‍ॅपवर बंदीनंतर चीनची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले “आम्ही या…..”

“टिकटॉकने करोडो युजर्सना वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांच्या कामाचा आनंद घेण्याची संधी दिली. अनेकांना यामुळे कमाईची नवी संधी उपलब्ध झाली. जागतिक स्तरावर आपल्यातील कलेचं प्रदर्शन करताना अनेकांना फक्त फिल्म स्टार तसंच खेळाडूंसाठी उपलब्ध असणाऱ्या ब्रॅण्डचं प्रमोशन करण्याची संधी मिळाली. गाव खेड्यात राहणाऱ्या अनेक टिकटॉक युजर्ससाठी हे सत्य आहे,” असंही त्यांनी सांगितलं आहे.

आणखी वाचा- Ban झालेल्या टिकटॉकला पर्याय, ‘या’ भारतीय App ची ‘डिमांड’ वाढली

केंद्र सरकारने टिकटॉक, शेअरइट, ब्युटी प्लस या लोकप्रिय चिनी अ‍ॅपसह एकूण ५९ अ‍ॅपवर बंदी घातली आहे. वापरकर्त्यांची माहितीचोरी, तिचा गैरवापर, राष्ट्रीय सुरक्षेला धोका आणि नागरिकांची मागणी यांच्या आधारे बंदी घालण्यात आल्याचे माहिती तंत्रज्ञान खात्याने निवेदनाद्वारे स्पष्ट केलं. देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेला धोकादायक असलेले घटक या माहितीचा गैरवापर करीत असून त्याद्वारे देशाची एकात्मता आणि सार्वभौमत्वाला धक्का पोहोचत आहे. ही अतिशय गंभीर आणि चिंताजनक बाब असून त्यावर तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे, असे केंद्रीय प्रसारण मंत्रालयाने बंदीचे आदेश जारी करताना म्हटले आहे. हे हानीकारक अ‍ॅप बंद करण्यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्रालयानेही सूचना केली होती. तसेच नागरिकांतूनही या अ‍ॅपबाबत तक्रारी येत होत्या, असेही मंत्रालयाने या आदेशांत म्हटलं आहे.