केरळमधल्या थ्रिसूर जिल्ह्यातल्या एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी १९ वर्षीय TikTok स्टारला पोलिसांनी काल अटक केली आहे. या बलात्कारानंतर ही मुलगी गरोदर राहिली आहे. पोलिसांनी अंबिली उर्फ विघ्नेश कृष्णा याला अटक केली आहे आणि त्याच्यावर POCSO कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

पोलिसांनी सांगितलं की विघ्नेशची या मुलीशी गेल्या वर्षी सोशल मीडियावर ओळख झाली होती. त्यानंतर त्यांच्या भेटीगाठी सुरु झाल्या. विघ्नेशने या मुलीला लग्नाचं वचन दिलं आणि तिला त्याच्या घरी घेऊन आला आणि तिच्यावर बलात्कार केला. जेव्हा विघ्नेशला कळलं की ती मुलगी गरोदर आहे आणि तिच्या पालकांनी आपल्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे, तेव्हा तो फरार झाला. पोलिसांनी त्याला शोधून काढलं तेव्हा त्यांना कळलं की विघ्नेशने पासपोर्टसाठी अर्ज दाखल केला होता. त्याचा परदेशात पळून जाण्याचा मानस होता.

आणखी वाचा- अमेरिकेत TikTok वरील बंदी उठली; मोदी सरकारही बायडन यांच्या पावलावर पाऊल टाकणार?

विघ्नेशला पकडण्यासाठी पोलिसांनी त्याच्या परिवाराला सांगितलं की त्याचा पासपोर्ट तयार आहे. त्यानंतर शनिवारी त्याचे वडील त्याला ही माहिती द्यायला जिल्ह्याच्या मेडिकल कॉलेजमध्ये गेले. पोलिसांनी त्याच्या वडिलांचा पाठलाग केला आणि त्याला पकडलं. त्याला अटक केल्यानंतर पोलिसांनी त्याची चौकशी केली.

चायनीज अॅप्सवर बंदी येण्याआधी विघ्नेश सोशल मीडियावर पच प्रसिद्ध होता. त्याच्या टिकटॉक व्हिडिओज खूप चाहते होते.