हाथरस येथील पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी व प्रियंका गांधी यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. अन्यायाविरोधात लढाई सुरूच राहील, जोपर्यंत न्याय होत नाही तोपर्यंत कुणीही आम्हाला रोखू शकत नाही. काँग्रेस पीडित कुटुंबाच्या पाठीशी असल्याचे त्यांनी सांगितले.

राहुल गांधी व प्रियंका गांधी पीडित कुटुंबाच्या घरातून बाहेर पडताच, माध्यमांनी त्यांना घेरले. माध्यमांशी बोलताना त्यांनी  अन्याविरोधात लढाई सुरूच राहील. जोपर्यंत न्याय होत नाही तोपर्यंत कुणीही आम्हाला रोखू शकत नसल्याचे म्हटले.

पीडित कुटुंबाचा आवाज कुणीही दाबू शकत नसल्याचं राहुल गांधी यावेळी सांगितलं. तर, त्या कुटुंबाने आपल्या मुलीला शेवटचं पाहिलं देखील नाही. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जबाबदारी समजली पाहिजे. असं प्रियंका गांधी यांनी यावेळी म्हटलं.

दरम्यान, हाथरस येथे घडलेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणावरून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. उत्तर प्रदेश सरकारवर यावरून सर्वस्तरातून टीका होत असताना, आता मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हाथरस येथील घटनेची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.