29 September 2020

News Flash

घटनेतील कलम ३७० व ३५ अ तात्काळ रद्द करण्याची ‘पनून’ची मागणी

मागणी विस्थापित काश्मिरी पंडितांच्या एका संघटनेने गुरुवारी केली.

| September 1, 2017 12:29 am

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

घटनेतील कलम ३७० व कलम ३५ अ मधील तरतुदींमुळे जम्मू- काश्मीरमध्ये विभाजनवादाची वाढ होण्यासच मदत झाली असल्याने ही दोन्ही कलमे तात्काळ रद्द करण्यात यावीत, अशी मागणी विस्थापित काश्मिरी पंडितांच्या एका संघटनेने गुरुवारी केली.

या तरतुदी (कलम ३७० व ३५ अ) हटवण्याची वेळ आली असल्याचे आम्हाला वाटते.त्यांनी राज्यात फुटीरवाद, विभाजनवाद आणि दहशतवाद यांच्या वाढीलाच मदत केली, असे पनून काश्मीरचे अध्यक्ष अश्वनीकुमार च्रुंगू पत्रकार परिषदेत म्हणाले.

काश्मीर व काश्मिरी पंडितांशी संबंधित मुद्दय़ांवर लोकांमध्ये तसेच विचारवंतांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी पनून काश्मीरच्या एका चमूने अलीकडेच मध्यप्रदेश, गुजरात, राजस्थन व दिल्ली या राज्यांचा दौरा केला. वरील कलमांमुळे एका राष्ट्रात दुसरे राष्ट्र निर्माण झाल्यासारखे होत असल्याने ते घटनेतून काढून टाकण्यास या राज्यांतील लोकांनी अनुकूलता दर्शवली. फुटीरवाद आणि विभाजनवाद यांचे घटनात्मक समर्थन करण्यासाठीही ही कलमे जबाबदार आहेत, असे या चमूचे नेतृत्व करणारे च्रुंगू यांनी सांगितले.

दहशतवादी संघटना हिज्बुल मुजाहिदीन आणि तिचा नेता सय्यद सलाहुद्दीन यांच्यावर अमेरिकेने घातलेल्या बंदीचे स्वागत करताना, काश्मीर खोऱ्यातील दहशतवादाचा अंत व्हावा ही अमेरिकेची इच्छा यातून दिसून येते असे आम्हाला वाटत असल्याचे च्रुंगू म्हणाले.

१९८९-९० साली काश्मिरी पंडितांच्या काश्मीर खोऱ्यातून झालेल्या विस्थापनाबाबत राज्याचे माजी मुख्यमंत्री फारुक अब्दुल्ला यांनी केलेल्या वक्तव्यावर च्रंगु यांनी टीका केली. सरकारचे प्रमुख म्हणून आपल्याला आलेल्या अपयशाचे समर्थन करण्याचा त्यांचा हा प्रयत्न आहे, असे ते म्हणाले.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 1, 2017 12:29 am

Web Title: time for article 370 35a of constitution to go says panun kashmir president
Next Stories
1 ‘मुस्लिम असल्यामुळेच मोदी सरकारकडून माझा छळ’
2 सुनील अरोरा मुख्य निवडणूक आयुक्त तर राजीव महर्षी यांची कॅगच्या प्रमुखपदी नियुक्ती
3 ‘हिट शिल्ड’ न उघडल्यामुळे ‘इस्रो’च्या आयआरएनएसएस-१एच उपग्रहाचे प्रक्षेपण अयशस्वी
Just Now!
X