News Flash

जगप्रसिद्ध ‘Time Magazine’ ची 19 कोटी डॉलरला विक्री

'टाइम'च्या विक्रीनंतर आता उर्वरित फॉर्च्यून, मनी आणि स्पोर्ट्स इलस्ट्रेटेड या मासिकांच्या विक्रीबाबतही चर्चा सुरू आहेत.

जगप्रसिद्ध ‘टाइम’ मासिक विकण्यात आलं आहे. ‘मेरेडिथ कॉर्प’ या अमेरिकी कंपनीने ‘सेल्सफोर्स’ कंपनीला ‘टाइम’ मासिक 19 कोटी डॉलरमध्ये विकलं. ‘सेल्सफोर्स’चे सह-संस्थापक मार्क बेनीऑफ आणि त्यांची पत्नी आता ‘टाइम’ मासिकाचे नवे मालक असणार आहेत.

‘द वॉल स्ट्रीट जर्नल’च्या वृत्तानुसार, ‘सेल्सफोर्स’च्या चार सह-संस्थापकांपैकी एक मार्क बेनीऑफ आणि त्यांच्या पत्नीने हे मासिक विकत घेतलं. सेल्सफोर्स ही ‘क्लाउड कंप्यूटिंग’ मधील दिग्गज कंपनी आहे. 190 मिलियन डॉलरमध्ये हा सौदा झाल्याचं ‘मेरेडिथ’कडून सांगण्यात आलं आहे. मात्र, पत्रकारितेशी निगडीत लिखाण आणि निर्णयांमध्ये बेनीऑफ यांचा हस्तक्षेप नसेल, त्याबाबतचे सर्व निर्णय टाइमचे सध्याचे कार्यकारी मंडळच घेईल असंही ‘मेरेडिथ’ने स्पष्ट केलं आहे.

मेरेडिथ कॉर्पने मार्च महिन्यामध्ये टाइम इन्कच्या चार मासिकांना विकण्याची घोषणा केली होती. ‘टाइम’च्या विक्रीनंतर आता उर्वरित फॉर्च्यून, मनी आणि स्पोर्ट्स इलस्ट्रेटेड या मासिकांच्या विक्रीबाबतही चर्चा सुरू आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 17, 2018 3:01 pm

Web Title: time magazine sold for 190 million to salesforce founder marc benioff
Next Stories
1 पर्समधल्या सॅमसंग गॅलेक्सी नोट 9 ला आग, विक्री थांबवण्याची मागणी
2 डान्सिंग अंकलचा डान्स पाहून घाबरली मुले…., VIDEO व्हायरल
3 मित्रांनी दिलं ‘इतकं महागडं’ लग्नाचं गिफ्ट की उपस्थितांना हसू आवरेना
Just Now!
X